Viral Video: सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दर दिवशी कुठे ना कुठे महिलांवर होत असलेल्या अत्याचाराशी संबंधित अनेक घटना ऐकायला मिळतात. देशासह जगाच्या कानाकोपऱ्यातून महिलांसोबत (Women) घडणाऱ्या गैरवर्तनाच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. कडक कायदे आणि पोलीस यंत्रणा सज्ज असतानाही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत.


सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये बंद लिफ्टमध्ये एक व्यक्ती महिलेशी गैरवर्तन करताना दिसत आहे. महिला शांतपणे उभी आहे, तरी हा माणूस पुन्हा-पुन्हा तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.


नेमकं घडलं काय?


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, लिफ्टमध्ये केवळ महिला आणि पुरुष दोघेच आहेत. लिफ्टमध्ये दोघांशिवाय कोणीही नाही, त्यामुळे महिला तिच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत तिचा फ्लोर येण्याची वाट पाहत आहे. लिफ्टमध्ये महिला एकटी असल्याचं पाहून पुरुषाची नियत फिरते, त्यामुळे तो महिलेच्याजवळ जातो आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला महिला घाबरते आणि त्याच्यापासून लांब जाऊन उभी राहते. तरीही हा माणूस शांत बसत नाही, तो तिच्या खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करतो.


महिलेने शिकवला चांगलाच धडा


हा माणूस महिलेचं शांत राहणं ही तिची कमजोरी समजतो आणि तिला छेडण्याचा प्रयत्न करतो. महिला त्या माणसापासून लांब गेली, तरी तो तिच्या जवळ जाऊन गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतो, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. पण या वेळी महिलेचा पारा चांगलाच चढतो. ती त्याचा हात झटकून त्याच्या जोरदार कानशिलात लगावते. एक कानाखाली खाताच पुरुषाची हालत खराब होते आणि त्याचे पाय थरथरु लागतात.


ही महिला खूप रागात असते, त्यामुळे ती फक्त कानशिलात लगावून शांत बसत नाही, तर ती त्या व्यक्तील दोन लाथादेखील मारते. त्यानंतर तो व्यक्ती खाली पडतो, त्याला योग्य धडा शिकवल्यानंतर महिला लिफ्टमधून बाहेर निघून गेल्याचंही दिसत आहे. पण हा माणूस तिथे तसाच पडलेला दिसतो. 






नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया


हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, हे पाहून अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. महिलेने केलेली कृती योग्य आणि कौतुकास्पद असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. प्रत्येक महिलेनं तिच्यासोबत होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि अशा पुरुषांना धडा शिकवला पाहिजे, असं देखील काहींनी म्हटलं आहे.


हेही वाचा:


India: 'या' गावातील महिला 5 दिवस घालत नाहीत कपडे; ही नेमकी कोणती परंपरा? जाणून घ्या