ISRO Space Mission : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या विक्रम लँडर (Vikram Lander) आणि प्रज्ञान रोव्हरची (Pragtan Rover) जोडी झोपेतून कधी जागी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इस्रो (ISRO) सातत्याने चांद्रयान-3 च्या (Chandrayaan-3 Mission) विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आता याच्या अपेक्षा मावळताना दिसत आहेत. कारण, चंद्रावर रात्र सुरु झाली आहे. चंद्रावर रात्र 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळे पुढील काही सुर्याची किरणे चंद्राच्या पृष्ठभागावर पडणार नाही. यामुळेच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमधून पुन्हा जागे होण्याचा आशा कमी होताना दिसत आहे. मात्र, इस्रोला या मोहिमेकडून अपेक्षा कायम आहेत.


विक्रम आणि प्रज्ञान कधी जागे होणार?


चंद्रावर 22 सप्टेंबर रोजी दिवस सुरु झाला. त्यानंतर सूर्याच्या किरणामुळे ऊर्जा मिळून लँडर आणि रोव्हर स्लीप मोडमधून जागे होऊन पुन्हा काम सुरु करतील, अशी अपेक्षा होती. 30 सप्टेंबरपासून चंद्राची रात्र सुरू झाली आहे. त्यामुळे चांद्रयान-3 शी पुन्हा संपर्क स्थापित करण्याची शक्यता कमी होत आहे. शिवशक्री पॉईंटवर सूर्यप्रकाश परत आल्यापासून इस्रो लँडर-रोव्हर जोडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण इस्रोच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये


चंद्रावर रात्र सुरु झाल्याने भारताच्या चांद्रयान-3 मोहिम पुन्हा सुरु होण्याच्या आशा मावळताना दिसत आहेत. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा 2 सप्टेंबरपासून स्लीप मोडमध्ये आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 23 सप्टेंबर रोजी स्लीप मोडमधून बाहेर पडण्याची अपेक्षा इस्रोने व्यक्त केली होती. मात्र, चंद्रावरील दिवस सुरु होऊन आता पुन्हा रात्रही सुरु झाली आहे. शिवशक्री पॉईंटवर सूर्यप्रकाश परत आल्यापासून इस्रो लँडर-रोव्हरच्या जोडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रयत्नांना यश आलेलं नाही.


लँडर आणि रोव्हर पुन्हा काम सुरु करण्याची अपेक्षा धूसर


चंद्रावरील रात्र पृथ्वीवरील अंदाजे 14 दिवसांची असते. रात्रीच्या वेळी चंद्रावरील तापमान अत्यंत थंड होते. यावेळी, चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान सुमारे उणे 180 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकते, त्यामुळे लँडर आणि रोव्हरच्या जोडीला सूर्याची उष्णता मिळून त्यामुळे पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता फार कमी आहे. सौर पॅनेल सूर्यप्रकाशाने चार्ज होऊन लँडर आणि रोव्हर पुन्हा काम सुरु करणं अपेक्षित आहे. पण, ही अपेक्षा आता धूसर होताना दिसत आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. चंद्रावर सूर्यकिरणे आल्यानंतर लँडर आणि रोव्हर ॲक्टिव्ह होतील, अशी इस्रोला अपेक्षा आहे


महत्वाच्या इतर बातम्या : 


ISRO Shukrayaan : चंद्र आणि सूर्यानंतर आता 'या' ग्रहावर नजर, इस्रोचा पुढचा प्लॅन काय?