Brooklyn Subway Shooting : न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थाळावरील एका फोटोत  गोळीबारातनंतर अनेक लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसत आहेत. अमेरिकन वेळेनुसार  सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


या गोळीबारानंतर न्यूयॉर्कमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर मेट्रोस्टेशनवर स्फोटही झाला आहे. त्यामुळे या परिसरासह शहरातील सर्व मेट्रो स्टेशनवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणी न्यूयॉर्कमधून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो स्टेशनवर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेनंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये अनेक ठिकाणांवरून घातक स्वरूपाचे बॉम्ब मिळाले आहेत. या घटनेनंतर अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. न्यूयॉर्क पोलीस आणि एफबीआयने या घटनेचा तपास चालू केला आहे. हल्लेखोराने मास्क घातलेला होता. दरम्यान न्यूॉर्कच्या राज्यपालांनी या घटनेवर दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. 






गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन विभागाने न्यूयॉर्कमधील लोकांना गोळीबार झालेल्या परिसरात जाण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे.


महत्वाच्या बातम्या