अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. याविषयी तज्ज्ञांच्या बैठकीपूर्वी मॉडर्ना कोविड -19 लसीबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एफडीएने मॉडर्ना लसीच्या वापरासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. ही लस सुरक्षित असून 94.2 टक्के प्रभावी असल्याचे एफडीएने सांगितले आहे.
अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्ना यांनी तयार केलेल्या कोरोना लसीसंदर्भात तातडीच्या मंजुरी संदर्भात तज्ञांशी झालेल्या बैठकीपूर्वी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या लसी संदर्भात एफडीएने म्हटले आहे की आपत्कालीन वापरास मान्यता देण्याबाबत सुरक्षिततेची कोणतीही चिंता उघडकीस आलेली नाही.
मॉडर्ना कंपनीने मार्चमध्ये प्रथमच मानवी लसीची चाचणी सुरू केली होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला अंतिम टप्प्यातील प्रारंभिक परीणामाची माहिती दिली. त्यात म्हटले आहे की कोविड -19 पासून संरक्षण देण्यासाठी त्यांची लस 95 टक्के प्रभावी आहे.
ज्या लोकांवर लसीची चाचणी करण्यात आली. त्यापैकी कोणालाही या आजाराची लक्षणे दिसली नाहीत. अंतिम निकालानंतर कंपनीने अमेरिका आणि युरोपमध्ये लसीच्या तातडीच्या वापराच्या मंजुरीसाठी अर्ज आणि डेटादेखील सादर केला आहे. मॉडर्नाची लस फायझर आणि जर्मन कंपनी बायोनोटॅक सारख्या एमआरएनए तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यासाठी, विषाणूच्या अनुवांशिक कोडमधून मदत घेण्यात आली.
अमेरिकेची औषध निर्माता कंपनी फायझरने अलीकडेच आपल्या कोरोनाव्हायरस लसीचा तात्काळ वापर करण्याची मागणी भारताकडे केली आहे. फायझर आणि बायोएनटेक या औषधी कंपनीद्वारे ही लस तयार केली जात आहे. याची फेज-3 चाचणी युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर ही लस 90 टक्के यशस्वी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
आनंदाची बातमी... अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरण सुरु, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस
Corona Vaccine | भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची शक्यता; सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांचे संकेत