मुंबई: अमेरिकेच्या बोस्टनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर (Martin Luther King Jr) आणि त्यांच्या पत्नी कोरेटा स्कॉट किंग (Coretta Scott King) यांच्या सन्मानार्थ एका शिल्पाचं अनावरण करण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी (Civil Rights Movement) लढणाऱ्या, पुढच्या पीढीला त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी आयुष्य वेचणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांना त्यांच्या कार्याबद्दल 1964 साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर किंग यांनी त्यांच्या पत्नीला घट्ट मिठी मारली, आणि हाच ऐतिहासिक क्षण या शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. 


शिल्पकार हँक विलिस थॉमस यांच्या कल्पनेतून हे शिल्प साकरण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मानवी हक्कासाठी लढणाऱ्या या महापुरुषाच्या आयुष्यावरील या शिल्पाचं काम त्यांच्या हातून साकारलं जाईल, त्यांना ही संधी मिळेल याची शक्यता त्यांना कधीच वाटली नव्हती. पण 125 शिल्पकारातून त्यांच्या शिल्पाची निवड झाल्यावर मात्र त्यांना सुखद धक्का बसला.  
 
सन 1964 साली मध्ये मार्टिन यांना शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची पत्नी कोरोटा स्कॉट किंग यांना मिठी मारतानाचा हा क्षण कॅमेरात कैद करण्यात आला होता. नंतरच्या काळात त्यांचा हा फोटो प्रसिद्ध झाला.  


Martin Luther King Sculpture: शिल्प नेमकं कसं आहे?


मार्टिन ल्यूथर किंग यांच्या आयुष्यावरील हे शिल्प 20 फूट लांब आणि 26 फूट रुंद आहे. “The Embrace” असं शीर्षक या शिल्पाला देण्यात आलं आहे. पूर्ण शिल्प कांस्य धातूपासून बनवण्यात आलं आहे.


आयुष्यभर मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या या महान जोडप्याचं स्मारक प्रेमाचे, हृदयाचे आणि आत्म्याचे प्रतिनिधित्व करते, ते इतरांनाही त्याच प्रकारची प्रेरणा देईल. 


शिल्पकार हँक विलिस थॉमस यामागील प्रेरणा सांगताना म्हणाला की, 
"त्या चित्रात, तुम्ही कोरेटा स्कॉट किंगच्या खांद्यावर मार्टिनचे वजन पाहू शकता जेव्हा ते मिठी मारतात, आणि मला जाणवले की हे खरोखरच हे त्याच्या वारशाचे रूपक आहे. मार्टिनची हत्या झाल्यानंतर तिने अनेक दशके त्याचा वारसा आपल्या खांद्यावर यशस्वी पेलला आहे."


किंगने आपले जीवन नागरी हक्क चळवळीला समर्पित केले, वांशिक समानता आणि आर्थिक न्यायासाठी लढा दिला. 1968 मध्ये त्यांच्या हत्येनंतर, कोरेटा यांनी शांतता आणि समानतेचा प्रचार करून LGBTQ समूदाय, महिला, मुले आणि गरीब लोकांसह उपेक्षित समूदायांसाठी वकिली करून त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला.


ही बातमी वाचा :