लाहोर: पाकिस्तानमधील लाहोर येथील प्रसिद्ध असलेल्या सुफी दर्ग्याजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात चार पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अकराव्या शतकातील दाता दरबार दर्ग्यात महिलांसाठी असलेल्या प्रवेशाजवळ हा स्फोट झाला.


सुफी दर्गा हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा दर्गा आहे. यापूर्वीसुद्धा 2010 साली सुफी दर्ग्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात तब्बल 40 लोकांचा मृत्यू झाला होता.

आज झालेल्या हल्ल्यात चार पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला आहे तर 18 नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानात दहशतीचं वातावरण आहे. हा हल्ला कुणाकडून करण्यात आला, यामागे काय कारण आहे यासंबंधी शोध सुरु झाला आहे.