Rome News : इटली पोलिसांना एका 70 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्याच घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या महिलेला तिच्या शेजाऱ्यांनी सुमारे दीड वर्षांपासून पाहिले नव्हते. त्या महिलेला कुणीही नातेवाईक नसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे देशातील वृद्धांची काळजी घेण्याची मागणी करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव मारिनेला बेरेटा असे आहे. या महिलेचेा कोणताही नातेवाईक हयात नाही. तिचा मृतदेह इटलीच्या उत्तरेकडील कोमो झीलजवळ प्रेस्टिनो येथे तिच्याच घरी सापडला आहे. मंत्री एलेना बोनेट्टी यांनी फेसबुकवर माहिती देत सांगितले की, 'कोमो येथे मारिनेला यांच्यासोबत जे झाले ते एकटेपणाचे फार वाईट उदाहरण आहे. एका समुदायातील लोकांना एकजुटीने राहायला हवे. हे समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे.' 


नॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (ISTAT) च्या 2018 च्या अहवालानुसार, इटलीमध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सुमारे 40 टक्के लोक एकटे राहतात. त्यांचे नातेवाईक किंवा मित्र नाहीत. इटलीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या दैनिक कोरीरे डेला सेराच्या पहिल्या पानावर संपादकीय लेखक मॅसिमो ग्रेमेलिनी यांनी लिहिले की, बेरेटा एकाकीपणाचे उदाहरण होत्या. त्यांनी लिहिले, आधुनिक कुटुंबे कमी होत आहेत. लोक एकटे मरतात आणि आम्हीही एकटे राहतो, हे फार वाईट आहे."


अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर 2019 पासून शेजाऱ्यांनी बेरेटाला पाहिले नव्हते. कोरोना महामारीच्या सुरुवातीस ती दूर गेली होती, कोरोनाचा 2020 मध्ये उत्तर इटलीवर परिणाम झाला. यात काहीतरी गडबड असल्याचे दाखविणारे काही पोलिसांना घटनास्थळी आढळून आले नाही.


"तिच्या झोपडीच्या बंद गेटच्या मागे मरिनेलाच्या अदृश्य जीवनाचे रहस्य आम्हाला एक भयानक धडा शिकवते," मेसिगेरो दैनिकाने म्हटले आहे. वृत्तपत्राने लिहिले की, "इतरांनी तिचा मृत्यू लक्षात घेतला नाही हे खरे दुःख नाही. खरे दुःख हे आहे की त्यांना मरिनेला बेरेटा जिवंत असल्याचे कळले नाही."


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha