पिट्सबर्ग : जगात अनेक भन्नाट आणि सामान्यांचा विश्वास बसणार नाहीत अशा घटना घडत असतात. जगात अनेकांना एक मुल सांभाळताना कसरत करावी लागते. मग जर 21 मुलं जन्माला घातली तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा. रशियात एक अशीच घटना घडली असून जॉर्जिया प्रदेशात राहणाऱ्या क्रिस्टिना ओजटक ही महिला चांगलीच चर्चेत आली आहे. या महिलेचं वय केवळ 24 वर्षे असून ती आता 21 मुलांची आई बनली आहे. सरोगसीच्या माध्यमातून तिने एकाच वर्षात तब्बल 21 मुलांना जन्म दिला असून त्यांच्या देखभालीवर वर्षाला जवळपास 72 लाख रुपयांचा खर्च होतोय. महत्वाचं म्हणजे आपल्याला शंभर मुलांची आई व्हायचं आहे अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. 


डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टिना ओजटक ही महिला गॅलिप या करोडपती व्यक्तीची पत्नी आहे. या दाम्पत्याने गेल्या वर्षीच्या मार्च ते जुलै या दरम्यान सरोगसीच्या माध्यमातून 21 मुलांना जन्म दिला आहे. या 21 मुलांना सांभाळण्यासाठी क्रिस्टिना ओजटक हिने 16 महिलांना कामाला ठेवलं आहे. या महिला 24 तास काम या मुलांच्या देखभालीचं काम करतात. क्रिस्टिना ओजटकचा पती गॅलिपला आधीच्या पत्नीपासून 2 मुलं आहेत. 


क्रिस्टिना म्हणते की,  "आपण सर्व वेळ या मुलांसोबत व्यस्त असतो, त्यांची काळजी घेतो. एक आई आपल्या मुलांसाठी जे काही करते ते सर्वकाही आपण या मुलांसाठी करतो. आमचा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. स्टाफच्या शेड्यूल तयार करण्यापासून ते अत्यावश्यक खरेदीची सर्व कामं मी करते."


क्रिस्टिना ओजटक ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे 1.60 लाख फॉओअर्स आहेत. ती त्यावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या मुलांसोबत खेळताना, त्यांची काळजी घेतानाचे अनेक व्हिडीओ ती शेअर करते आणि त्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. 


महत्वाच्या बातम्या :