Bill Gates :  Seattle Post-Intelligencer आणि बिल गेट्स यांच्यावर दोन पुस्तकं लिहिणाऱ्या पत्रकार James Wallace यांनी मायक्रोसॉफ्टच्या जगविख्यात सहसंस्थापकांच्या बाबतीत काही गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. 80 आणि 90 च्या दशकात बिल गेट्स यांचं आयुष्य नेमकं कसं होतं य़ावर त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे. 


युके येथील 'डेली मेल'शी संवाद साधताना James Wallace यांनी म्हटलं, 'गतकाळात मायक्रोसॉफ्टसाठी काम करणारी ही मुलं एखाद्या कोडवर कित्येक दिवस काम करत, त्याच टीशर्टवर दोन-तीन दिवस असत. यानंतर मात्र ते धमाकेदार पार्टी करत असत. ही काहीशी ''वाईल्ड पार्टी...'' असे. यामध्ये ते सिअॅटलमधील स्टीपर्स आणत, बिलच्या घरीही त्यांने ते घेऊन येत असत. ते (बिल) कधीही संगणाकातच मग्न असणाऱ्या मुलांपैकी नव्हते'. 


Wallace यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केल्यानुसार बिल यांच्या इतर महिलांशी असणाऱ्या नात्यामुळं मेलिंडा आणि त्यांच्या नात्यात सुरुवातीच्या काळात वादळं निर्माण झाली होती. 'बिल गेट्स यांनी 1988 पासून मेलिंडा यांना डेट करण्यास सुरुवात केली. पण कामाच्या निमित्तानं बाहेर असताना त्यांचं हे रुप अनेकदा पाहायला मिळायचं. मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या कंपनी इंडस्ट्रीसाठी काम करणाऱ्या महिला पत्रकारांशी त्यांची सहसा सलगी असायची', असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला. 


वैवाहिक नात्यातून विभक्त होताना बिल गेट्स- मेलिंडा यांचा मोठा निर्णय


यासोबतच पुस्तकात त्यांनी हेसुद्धा नमूद केलं की, मेलिंडा यांना बिल गेट्स यांच्या या सर्व गोष्टी ठाऊक होत्या. ज्याचे थेट परिणाम हे त्यांच्या नात्यावर होणाऱ्या चढ- उतारांच्या स्वरुपात होत होते. एका वळणावर तर त्यांच्या या नात्यात वर्षभरासाठीचा दुरावाही आला होता. कारण, गेट्स यांनी नात्यात कोणत्याही प्रकारची भूमिका घेण्यास नकार दिला होता. 1992 मध्ये अखेर ते या नात्यात पुन्हा एकत्र आले आणि हे नातं पुन्हा बळकट झालं. 


काही दिवसांपूर्वीच बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा घटस्फोटाचा निर्णय


मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगभरातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असणाऱ्या बिल गेट् आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास आता इथवरच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती.