महाड : एक महिला, एक गाडी, 2 खंड, 3 वाळवंट, 9 पर्वतरांगा, 9 टाईमझोन, 32 देश, 75 दिवस आणि 35 हजार किलोमीटर प्रवास. भारुलता कांबळे... एक ध्येयवेडी बाई... जिने एका हा महाकाय पराक्रम केला आहे. 75 दिवसात इंग्लंडपासून भारतापर्यंतचा प्रवास, तोही बाय रोड.


भारुलता या मूळच्या सूरतच्या आहेत. महाड हे त्यांचं सासर. महाड हेच त्यांचं डेस्टिनेशन होतं. इथं दाखल होताच त्यांचं जल्लोषी स्वागत झालं. पण भारुलता यांनी हे सारं केलं ते फक्त विक्रमासाठी नाही, तर एका संदेशासाठी... 'बेटी बचाओ'.

भारुलता कांबळे कुटुंबात उपेक्षित राहिल्या. घरात मुलगी आणि मुलगा असा भेद झाला होता. त्यामुळेच त्यांनी हा विक्रम करण्याचं ठरवलं. मुलगा केवळ एकाच घराचं नाव उज्ज्वल करतो. पण मुलगी सासर आणि माहेर अशा दोन्ही घरांचं नाव उज्ज्वल करते, असं भारुलता सांगतात.

तुमची कमजोरी हीच तुमची शक्ती बनते हे भारुलता यांनी सिद्ध करुन दाखवलं. पण हा प्रवास तोही एकटीने सोपा नव्हता.



बरं या 32 देशांमधून प्रवास म्हणजे तिथल्या भाषांचे स्पीडब्रेकर्स आलेच असतील. भारुलता ज्या देशात गेल्या, त्या देशात त्यांना अपार प्रेम मिळालं. काही अडथळे आले पण त्यांच्या मनसुब्यांना धक्काही लागला नाही.

पण या प्रवासापेक्षा आणखी मोठा प्रवास भारुलता यांना करायचा आहे. भारुलता यांना 10 मुली दत्तक घ्यायच्या आहेत.

भारुलता यांचा विक्रम कौतुकास्पद तर आहेच. पण त्यांचा उद्देश हा अनुकरणीय आहे. त्यांच्या पुढच्या प्रत्येक प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा...

पाहा व्हिडीओ