एक्स्प्लोर

Belgian Mother : माता न तू वैरिणी! पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या करणारी आई, 16 वर्षानंतर मिळालं इच्छामरण

Belgian Woman : जिनेव्हीव्ह लरमिटने (Genevieve Lhermitte) मुलांना मारल्यानंतर स्वतःला चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा प्रयत्न अयशस्वी झाला.

Belgiam Mother Murder : बेल्जियममधील महिलेने पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या केली होती. आता 16 वर्षांनंतर तिला विनंतीनुसार इच्छामरण देण्यात आलं. 2007 मध्ये बेल्जियममधील एका महिलेने स्वतःच्या पाच मुलांची हत्या केली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. यानंतर, जिनेव्हिव्ह लरमिट नावाच्या महिलेच्या वकिलाने गुरुवारी (2 मार्च) सांगितलं की, हत्येप्रकरणी 16 वर्षांनंतर तिला विनंतीनुसार इच्छामरण देण्यात आलं.

पोटच्या चार मुलांचा चिरला गळा

जिनेव्हीव्ह लरमिटने (Genevieve Lhermitte) 28 फेब्रुवारी 2007 रोजी तिने पाच मुलांची हत्या केली. निव्हेलस शहरात ही घटना घडली होती. तिच्याच घरात स्वयंपाकघरातील चाकूने तीन ते 14 वयोगटातील तिच्या पाच मुलांचा गळा चिरला. यामध्ये एक मुलगा आणि चार मुलींचा समावेश होता. ही घटना घडली त्यावेळी जिनेव्हीव्ह लरमिटचा नवरा घराबाहेर होता.

मुलांच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पाच मुलांची हत्या केल्यानंतर जिनेव्हीव्ह लरमिटने स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण तिने चाकूने वार केल्यानंतर आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. यामुळे या महिलेचे प्राण वाचले. जिनेव्हीव्ह लरमिटला 2019 मध्ये उपचारासाठी मानसिक रुग्णालयात हलवण्यात आलं. 2008 मध्ये तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

जिनेव्हीव्ह लरमिटचे 56 वर्षीय वकील निकोलस कोहेन यांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की, हत्येच्या 16 वर्षांनंतर मंगळवारी (28 फेब्रुवारी) त्याच्या क्लायंटला इच्छामरणाच्या विनंतीनुसार मृत्यूदंड देण्यात आला.

इच्छामरणाची दिली परवानगी 

बेल्जियमचा कायद्याअंतर्गत इच्छा मृत्यूला परवानगी देण्यात येते. जर लोकांना असह्य मानसिक आजा, शारीरिक आजाराने ग्रस्त असल्याचे मान्य झाल्यास कायद्याअंतर्गत बेल्जियमध्ये इच्छामरणाची परवानगी दिली जाते. यासाठी एखाद्याच्या निर्णयाची जाणीव असणे आवश्यक आहे. तसेच एखाद्याची इच्छा तर्कसंगत आणि सुसंगतपणे कायद्यापुढे व्यक्त करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जिनेव्हीव्ह लरमिटच्या वकिलाने सांगितलं की, ही एक विशेष प्रक्रिया आहे, ज्या जिनेव्हीव्ह लरमिटने विनंती केली होती. तिच्या मानसिक स्थिती संबंधित विविध वैद्यकीय मतांनुसार परवानगी देण्यात आली.

''... म्हणून केली मुलांची हत्या''

लरमिटला गंभीर मानसिक समस्या होती. ती मानसिक आजाराने त्रस्त होती आणि नियमितपणे मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेत होती. लरमिटने पोलिसांना सांगितलं की, घरातील ताणतणाव आणि त्रासामुळे तिने तिच्या मुलांची हत्या केली.

जिनेव्हिव्ह लरमिटला जगण्याची इच्छा नव्हती

मानसशास्त्रज्ञ एमिली मारोइट यांनी आरटीएल-टीव्हीआय चॅनेलला माहिती देताना सांगितले की, लरमिटने कदाचित 28 फेब्रुवारी रोजी आपल्या मुलांची हत्या केल्यानंतर मरण्याचा निर्णय घेतला. मारोइट म्हणाल्या की, तिने जे सुरु केलं ते तिला संपवायचं होतं. मुळात तिला तिचं स्वत:चं जीवन संपवायचं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget