ISKCON Temple Attack : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात तोडफोड करण्यात आली आणि जमावाने येथे ठेवलेल्या मौल्यवान वस्तूही लुटल्या. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. हाजी सैफुल्लाच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक लोकांच्या जमावाने हा हल्ला केला होता. मंदिराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली.


ढाकामधील वारी येथील 222 लाल मोहन साहा स्ट्रीटवर असलेल्या इस्कॉन राधाकांता मंदिरात सायंकाळी 7 वाजता हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. हाजी सैफुल्लाच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक लोकांच्या जमावाने हा हल्ला केला होता. मंदिराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.






 


बांगलादेशात हिंदू मंदिरावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्या वर्षी नवरात्रीला हिंदूंविरोधात अफवा पसरवून दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. एवढेच नाही तर हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले. त्यावेळी ढाका येथील इस्कॉन मंदिरावरही हल्ला झाला.


बांगलादेशात 9 वर्षांत हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले
बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांवर काम करणाऱ्या AKS या संस्थेनुसार, बांगलादेशातील अल्पसंख्याकांना गेल्या 9 वर्षांत 3,679 हल्ल्यांचा सामना करावा लागला. यादरम्यान धार्मिक स्थळांची तोडफोड आणि सशस्त्र हल्ल्याची 1678 प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय हिंदू समाजाला लक्ष्य करून घरांची तोडफोड, जाळपोळ यासह वारंवार हल्ले होत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha