Bangladesh Financial Crisis: श्रीलंका सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अशातच आता बांगलादेशावरही आर्थिक संकटाचे ढग दाटून आले आहेत. बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तू, इंधन, मालवाहतूक आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे बांगलादेशचा आयात खर्च वाढला आहे. जुलै 2021 ते मार्च 2022 या कालावधीत बांगलादेशकडून वस्तूंवर केल्या जाणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.


आयातीवरील खर्चात वाढ


बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयातीवरील खर्च वाढला असला तरी त्या तुलनेत निर्यातीतून मिळणारे उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे व्यापार तूट सातत्याने वाढत आहे. आयातीवर अधिक डॉलर खर्च करावे लागत आहे, निर्यातीच्या तुलनेत परकीय चलन मिळालेले नाही, त्यामुळे परकीय चलनाचा साठा कमी होत आहे.


एका वृत्तानुसार, बांगलादेशच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. तसेच परकीय चलन साठा शिल्लक असलेल्या रकमेतून, केवळ 5 महिन्यांसाठी आयात आवश्यकता पूर्ण केल्या जाऊ शकतात. यातच जर जागतिक बाजारात वस्तू, क्रूड ऑइल आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढत राहिल्या तर पाच महिन्यांपूर्वीच हा परकीय चलनाचा साठा संपू शकतो. 2021-22 च्या जुलै ते मार्च दरम्यान, बांगलादेशने 22 अब्ज डॉलर्सच्या किमतीचा औद्योगिक कच्चा माल आयात केला आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत 54 टक्के अधिक आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आयात खर्चात 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


निर्यात वाढली पण परकीय चलन कमी झाले


बांगलादेशचे निर्यात लक्ष 2021-22 आर्थिक वर्षाच्या 10 महिन्यांत पूर्ण झाले आहे. बांगलादेशने 43.34 अब्ज डॉलरची उत्पादने निर्यात केली आहेत. जे गतवर्षीच्या तुलनेत 35 टक्के अधिक आहे. जुलै 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान, कपड्यांची निर्यात, चामड्याची निर्यात आणि त्याच्या उत्पादनांमध्ये एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जून महिन्याची निर्यात आणि त्यातील उत्पादनांनीही जवळपास एक अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा स्थितीत बांगलादेशचे आयात खर्च वाढला असला तरी, निर्यातीतून उत्पन्न वाढू शकते. मात्र निर्यात वाढली असली तरी उत्पन्नात घट झाली आहे. बँक आणि खुल्या बाजारात डॉलरच्या दरात सुमारे 8 रुपयांची तफावत आहे. बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, बाहेरील देशात काम करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी 2020-21 मध्ये 26 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त परकीय चलन साठा पाठवला होता, जो 2021-22 मध्ये 17 बिलियन डॉलर्सच्या जवळ आला आहे.


दरम्यान, डॉलरच्या संकटाचा सामना करण्यासाठी बांगलादेश सरकारने लक्झरी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली असून सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली आहे. तसेच अत्यावश्यक नसलेल्या प्रकल्पांच्या बांधकामावर तात्पुरती बंदी घालू शकतात. सध्या बांगलादेशकडे 42 अब्ज डॉलरची परकीय चलन साठा आहे.