Elon Musk Reply To Parag Agrawal : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची ट्विटरसोबतचा (Twitter) करार सध्या वादात सापडल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे. एलॉन मस्क यांना ट्विटरवर किती 'फेक' (Fake Account) या 'स्‍पॅम' (Spam Account) किंना 'बॉट्स' अकाउंट (Boots Account) आहेत, याबाबत पूर्ण माहिती हवी आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी यासंदर्भात सोमवारी एक मोठी पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी सांगितलं की ट्विटर संभाव्य स्पॅम अकाऊंटचं मानवी पुनरावलोकन (Human Review) करुन घेते.


पराग अग्रवाल यांच्या ट्विटर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया देत तुम्ही त्यांच्यासोबत फोन करत संपर्क करण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न उपस्थित केला. मस्क यांनी ट्विटरवरील सर्व स्पॅम अकाऊंट्स बंद करायचे आहेत. अलिकडेच टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केलं आहे. या वर्षाच्या शेवटी ट्विटर आणि मस्क यांच्यातील करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान ट्विटरवर या दोघांमधील जुंपली पाहता, ट्विटर डील धोक्यात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.




पराग अग्रवाल यांनी काय म्हटलं?
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी डझनहून अधिक ट्विट करत स्पॅम अकाऊंटबाबत तथ्य समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की कंपनी दररोज पाच लाखांहून अधिक स्पॅम खाती अकाऊंट बंद करत आहे. दर आठवड्याला लाखो खाती निलंबित होत आहेत. त्यांनी सांगितलं की, 'आम्ही स्पॅम अकाऊंट शोधण्यात परिपूर्ण नाही.' अग्रवाल यांच्या मते, गेल्या चार तिमाहीतील अंतर्गत अंदाजात स्पष्ट झालं आहे की स्पॅम खात्यांची संख्या एकूण युजर्सपेक्षा पाच टक्क्यांहून जास्त नाही.




एलॉन मस्क यांनी दिलं 'हे' उत्तर
अग्रवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, संभाव्य स्पॅम अकाऊंटचा सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही डेटा, IP, फोन नंबर, स्थान, ब्राउझरचा वापर करत मानवी पुनरावलोकन (Human Review) केले जाते. यावर मस्क यांनी विचारले की, तुम्ही युजर्सना कॉल करण्याचा प्रयत्न केला आहे का? यावर अग्रवाल यांनी ट्विटर करत स्पॅम खात्यांच्या संख्येचा बाहेरून अंदाज लावला जाऊ शकत नाही, असं म्हटलं. यानंतर मस्क यांनी 'पाइल ऑफ पूप' इमोजी ट्विट केलं. 




महत्त्वाच्या इतर बातम्या