Woman not slept for 4 years news : मेडिकल सायन्सच्या दुष्टीने निरोगी शरीरासाठी पुरेशी झोप मिळणे फार गरजेचं आहे. रोज किमान 6 तासांची झोप मानवी शरीराजी गरज आहे. पण जर आम्ही तुम्हाला असं सांगितलं की मागच्या 4 वर्षांपासून एक महिला झोपलीच नाही तर तुमचा विश्वास बसेल का ? सध्या सोशल मिडीयावर एका महिलेच्या गंभीर आजाराची चर्चा सुरु आहे. 39 वर्षीय पोलिस महिला मालगोरजाटा स्लिविंस्का (Malgorzata Sliwinska)ही गेले 4 वर्ष झोपलीच नाहीये. याचं कारण या महिलेचा मेंदू आरामच करत नव्हता. जाणून घ्या या महिलेची संपूर्ण गोष्ट. 


निरोगी आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम -


The Sunच्या रिपोर्टनुसार, मालगोरजाटा ही एका दुर्मिळ (Rare Sleep Disorder)आणि गंभीर आजाराने त्रस्त आहे.  सोमनीफोबिया (Somniphobia)असं या आजाराचं नाव आहे. या आजाारामुळे महिलेला गेली कित्येक रात्र झोपच येत नाहीये.  ही महिला सलग 1400 दिवसांहून जास्त दिवस जागी आहे. याचाच परिणाम  महिलेच्या शारीरिक आणि सामाजिक जीवनावरही झाला आहे. आजारामुळे तिचे डोळे थकून जातात. डोळ्यांमध्ये सूज येते एवढेच नाही तर या आजारामुळे महिलेला डोकेदुखी आणि शॉर्ट टर्म मेमरीसारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय. या दुर्मिळ आजारामुळे महिलेवर स्मृतिभ्रंशाचा परिणाम झाला आहे. 


कसे कळले आजाराबद्दल -
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार मालगोरजाटाला तिच्या आजाराबद्दल 2017 मध्येच कळले होते जेव्हा ती स्पेनहून सुट्ट्या घेऊन आली होती. तेव्हापासून तिची झोप उडाली आहे. झोपण्याचे अनेक प्रयत्न आणि प्रकार करूनसुद्धा तिला झोप येत नव्हती. झोपेच्या गोळ्या घेऊन तिला काही तासांकरता झोप लागायची पण त्यानंतर वाढत्या गोळ्यांच्या अभावामुळे त्याचा परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागला. सध्या मालगोरजाटा पोलॅंडच्या एका डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. उपचारानंतर आता मालगोरजाटा आठवड्यातले 2-3 रात्र झोपू शकते आहे. याचबरोबर ती या गंभीर आजारातून मुक्त होण्यासाठी नियमित योगा आणि व्यायामदेखील करतेय. 


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha