ऑस्ट्रियाच्या परराष्ट्र मंत्री केरिन नेसल शनिवारी लग्नाच्या बेडीत अडकल्या. त्याच दिवशी पुतिन जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कल यांची भेट घेण्यासाठी बर्लिनला निघाले होते. मात्र लग्नाला हजेरी लावण्यासाठी ते ऑस्ट्रियाला थांबले. पुष्पगुच्छ घेऊन पुतिन कारने विवाहस्थळी दाखल झाले, तसे उपस्थितांचे डोळे विस्फारले.
पांढराशु्भ्र झगा घातलेल्या केरिन यांच्यासोबत पुतिन यांनी केलेला डान्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. पाश्चात्य संस्कृतीत अशा प्रकारचा मोकळेपणा असला, तरी दोन राष्ट्रांच्या नेत्यांनी केलेलं नृत्य आश्चर्यचकित करणारं होतं.
53 वर्षीय केरिन या इंटरप्रिन्युअर वुल्फगँग मेलिनरसोबत विवाहबद्ध झाल्या. दक्षिण स्टिरीयातील एका वाईनयार्डमध्ये दोघांचं लग्न झालं.
पुतिन आणि केरिन यांची मैत्री जुनी असली, तरी युरोपियन युनिअन आणि रशियाचे संबंध ताणले गेले असतानाच पुतिन यांनी या लग्नाला हजेरी लावणं अनेकांसाठी भुवया उंचावणारं होतं.
पाहा डान्स व्हिडिओ :