Russia Ukraine War : रशियातून क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या स्फोटानंतर रशियाने युक्रेनमध्ये एकप्रकारे नरसंहार सुरु केला आहे. युक्रेनमध्ये रशियाकडून तब्बल 75 मिसाईल्स अनेक शहरांवर डागण्यात आल्या आहेत. इतक्यावर न थांबता रशियाने आणखी हल्ल्यांची धमकी देण्यात आली आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. रशियाने केलेल्या आजच्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जखमी झाले आहेत. 


क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर युक्रेनकडूनच स्फोट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे रशियाकडून होत असलेला आरोप युक्रेनने फेटाळून लावला आहे.  युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये मिसाईल हल्ला सुरु आहे. आमच्या देशातील अनेक शहरांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती असल्याचे राष्ट्राध्यय कार्यालयातील उपप्रमुख कायरिलो टायमोशेन्को यांनी सांगितले. युक्रेनवासियांना शेल्टरमध्ये राहण्यास त्यांनी सांगितले आहे. रशियाने 75 मिसाईल्स डागल्याचे युक्रेनने म्हटले आहे.






युक्रेनची राजधानी किव्हमध्ये सकाळी सव्वा आठच्या सुमारास स्फोट झाला. जवळपास पाच हल्ले किव्ह शहरावर झाले. शेवचेन्किव्स्की जिल्ह्याच्या मध्यवर्ती परिसरातही अनेक स्फोट झाल्याचे किव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले. 


रशियाकडून आज युक्रेनमधील उर्जा ठिकाणांवर लक्ष्य करण्यात आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये अनेक शहरांत स्फोटात धुराचे लोट येताना दिसून येत आहेत. यापूर्वी 26 जून रोजी किव्ह शहरावर हल्ला केला होता. 






रशियातून क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर स्फोट झाल्यानंतर रशियाने युक्रेनमधील हल्ले वाढवले आहेत. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. दुसरीकडे पुलावर झालेल्या स्फोटानंतर युक्रेनमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता. सोशल मीडियावरही आनंद व्यक्त करण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या