Nobel Prize 2022 List : महान स्विडिश रसायनशास्त्रज्ञ एल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) यांच्या नावाने दिले जाणारे जगातील महान पुरस्कारांपैकी एक म्हणजे नोबेल पुरस्कार (Nobel Prize). सध्या 2022 नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2022) विजेत्यांची नाव जाहीर केली जात आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्र, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य क्षेत्रासह शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर नेमका कोणाला कोणता पुरस्कार मिळाला जाणून घेऊ...
नॉर्वेजियन नोबेल समिती अल्फ्रेड नोबेल यांच्या विलप्रमाणे दरवर्षी नोबेल पारितोषिक विजेते घोषित करत असते. नॉमिनेशन आणि नंतर विजेता घोषित करण्याचं काम नॉर्वेजियन नोबेल समिती करत असते. यंदा नोबेल पुरस्कार विजेते 3 ऑक्टोबर 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान सोमवारी (3 ऑक्टोबर) वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार स्वीडनच्या स्वांते पाबो यांना देण्यात येणार आहे. तर मंगळवारी भौतिक शास्त्राच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर बुधवारी रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. तर साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना जाहीर झाला. ज्यानंतर आज मानवधिकार हक्कांसाठी लढणारे वकिल अॅलेस बिलियात्स्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला आहे.
नोबेल पुरस्कार 2022 विजेत्यांची यादी
पुरस्काराचा प्रकार | विजेते |
वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार | स्वीडनचे स्वांते पाबो |
भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार | अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर |
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार | कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस |
साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार | फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो |
नोबेल शांतता पुरस्कार | बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की आणि रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटना |
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.
हे देखील वाचा
Noble Prize | स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल