Asian Rich list 2022 : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान ऋषी सुनक ( Rishi Sunak) आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचा ब्रिटनमधील 'एशियन रिच लिस्ट 2022' मध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत हिंदुजा कुटुंब अग्रस्थानी आहे. सुनक आणि अक्षता मूर्ती यांची अंदाजे संपत्ती £790 दशलक्ष असून ते यादीत 17 व्या क्रमांकावर आहेत. अक्षता मूर्तीचे वडील एनआर नारायण मूर्ती हे भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक आहेत. या वर्षीच्या यादीत समाविष्ट श्रीमंतांची एकूण संपत्ती 113.2 अब्ज पौंड आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.5 अब्ज पौंड जास्त आहे. ऋषी सुनक हे आधी बँकर आणि नंतर राजकारणी बनले. ते 210 वर्षातील सर्वात तरुण ब्रिटिश पंतप्रधान असून यंदाच्या आशियाई श्रीमंतांच्या यादीत ब्रिटनमध्ये 16 वे अब्जाधीश आहेत.


हिंदुजा कुटुंब सलग आठव्यांदा अव्वल


हिंदुजा कुटुंबाने सलग आठव्यांदा या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांची अंदाजे संपत्ती 30.5 अब्ज पौंड आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 अब्ज पौंड जास्त आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी बुधवारी रात्री वेस्टमिन्स्टर पार्क प्लाझा हॉटेलमध्ये 24 व्या वार्षिक एशियन बिझनेस अवॉर्ड्स हा सोहळा पार पडला, या दरम्यान हिंदुजा ग्रुपचे सह-अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांची कन्या रितू छाब्रिया यांना 'एशियन रिच लिस्ट 2022' ची प्रत दिली. ज्यामध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. 


210 वर्षातील सर्वात तरुण ब्रिटिश पंतप्रधान
ऋषी सुनक हे आधी बँकर आणि नंतर ते राजकारणी बनले. ते 210 वर्षातील सर्वात तरुण ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान आहेत. या वर्षीच्या आशियाई श्रीमंतांच्या यादीत ब्रिटनमध्ये 16 अब्जाधीश आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे किंवा तशीच राहिली आहे.


श्रीप्रकाश लोहिया यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ 
आशियाई श्रीमंतांच्या यादीत 16 अब्जाधीश आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 अधिक आहे. यातील बहुतांश अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे किंवा तशीच आहे. यावर्षी श्री प्रकाश लोहिया आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 4 अब्ज पौंडांची मालमत्ता असलेल्या लोहिया कुटुंबाकडे आता दुप्पट म्हणजेच 8.8 अब्ज पौंड इतकी संपत्ती आहे. स्टील किंग लक्ष्मी मित्तल आणि त्यांचा मुलगा आदित्य मित्तल 12.8 अब्ज पौंड आणि 6.5 अब्ज पौंड असलेले आणखी एक भारतीय निर्मल सेठिया या यादीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Viral News : लेकीचा सांभाळ करण्यासाठी वडिलांनी सोडली लाखो रुपयांची नोकरी! नेटकऱ्यांकडून आश्चर्य, प्रतिक्रियांचा पाऊस