Trending Story : मूल झाल्यावर जगातील प्रत्येक जोडप्याला आई-वडील (Parents) होण्याच्या आनंदाला सीमा नसते, भारतात मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना बाळाची काळजी घेण्यासाठी विशिष्ट महिन्यांची प्रसूती रजा (Maternity Leave) दिली जाते, तर जे पुरुष पिता बनतात, त्यांना पितृत्व रजेच्या नावावर फक्त काही दिवसांची सुट्टी दिली जाते. आता जर वडिलांना आपल्या मुलाची किंवा पत्नीची काळजी घेण्यात जास्त वेळ घालवायचा असेल तर त्यांना क्वचितच सुट्टी मिळते. दरम्यान, मूल झाल्यानंतर उद्योगपती आणि व्यावसायिक वडील काही दिवस सुट्टी घेतल्याचं समोर आलं आहे, मात्र मुलीचा सांभाळ करण्यासाठी एका बापाने चक्क लाखो रुपयांची नोकरी सोडली आहे. ही बातमी समोर येताच सर्व नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Viral News)
नवजात मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी लाखोंची नोकरी सोडली
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरचे माजी विद्यार्थी अंकित जोशी यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या नवजात मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी लाखोंची नोकरी सोडली. ते एका कंपनीचे सीनियर वाइस प्रेसिडेंट होते. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अंकित जोशीने त्यांच्या निर्णयाबद्दल सांगितले की, 'माझ्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधी मी माझी चांगली पगाराची नोकरी सोडली. मला माहित आहे की हा एक विचित्र निर्णय होता. या निर्णयामुळे पुढे त्रास होईल असे लोकांनी त्यांना बजावले होते, पण या निर्णयात त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली असे जोशी सांगतात.
"ते कठीण होणार आहे, पण...."
अंकित जोशी यांच्या मुलीचे नाव स्पिती ठेवण्यात आले, कारण त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्पिती व्हॅलीच्या सहलीनंतर या प्रेक्षणीय जागेवरून त्यांच्या मुलीचे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यापासून जोशी यांनी स्पितीची काळजी घेण्यासाठी आपला वेळ दिला आहे. अंकित जोशी यांनी सांगितले की, ते काम करत असलेल्या कंपनीत त्यांना पुन्हा पुन्हा जावे लागत होते. मुलगी 'स्पिती'च्या जन्मानंतर ते यासाठी तयार नव्हते. तसेच म्हणाले, 'माझी मुलगी जगात येण्यापूर्वीच मला माहित होते की मला माझा सर्व वेळ माझ्या मुलीसोबत घालवायचा आहे. मला माहित होते की ते कठीण होणार आहे. मी काही महिन्यांपूर्वीच ही नवीन नोकरी सुरू केली होती.
व्हायरल पोस्ट
ही पोस्ट इंस्टाग्रामवर आतापर्यंत 210 हजाराहून अधिक लाईक्ससह व्हायरल झाली आहे. या पोस्टवर इंटरनेट यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत, काही यूजर्स त्याच्या निर्णयाशी सहमत असल्याचे दिसत आहे, तर अनेक जण त्याच्या निर्णयावर खूश नाहीत. अंकितला त्याच्या मुलीच्या जन्मानंतर दीर्घ विश्रांती हवी होती, तेव्हा त्याने नोकरी सोडली तसेच त्याला "Promotion To Fatherhood" असेही म्हटले गेले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: