Argentina News : अर्जेंटिना (Argentina) आणि उरुग्वेमध्ये (Uruguay) भीषण वादळ (Strom) आलं आहे. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानी झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटपर्यंत या वादळात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. भयानक वादळामुळे येथे सोसाट्याचा वारा सुटला आहे, ज्यामुळे ठिकठिकाणी विजेचे खांबही पडलेले दिसत आहेत. या वादळात विमान रनवेवरच फिरलं आहे. यावरून या वादळाची भीषणता समोर येत आहे.


वादळात रनवेवर पार्क केलेलं विमान 90 डिग्री फिरलं


या वादळामुळे विमान रनवेवर 90 डिग्रीपर्यंत फिरलं. 17 डिसेंबर रोली ब्युनस आयर्स जॉर्ज न्यूबेरी आंतरराष्ट्रीत विमानतळावर पार्क केलेल्या विमानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भीषण वादळी वाऱ्यांमुळे रनवेव पार्क केलेलं विमानंही फिरलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वादळामुळे येथे तुफानी वारे वाहत आहे, या वाऱ्यांचा वेग इतका आहे की विमानही जागेवरून हललं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे रनवेवर पार्क केलेलं विमान 90 अंशापर्यंत फिरलं. विमानामध्ये चढताना वापरल्या जाणाऱ्या शिडीवरही विमान आदळलं.


पाहा व्हायरल व्हिडीओ :






वादळाचा कहर


अर्जेंटिना आणि त्याच्या शेजारी देश उरुग्वेला जोरदार वादळ धडकलं आहे. यामुळे अर्जेंटिनाच्या राजधानीतील इमारतींचे नुकसान झालं आहे. ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळादरम्यान, ब्युनोस आयर्सपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरेनो शहरात झाडाची फांदी अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. उरुग्वेमध्ये वादळामुळे झाडे पडली आणि छत उन्मळून पडल्याने रविवारी दोन जणांचा मृत्यू झाला. अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिला यांनी रविवारी अनेक मंत्र्यांसह बाहिया ब्लँकाला भेट दिली आणि तेथील परिस्थितीची पाहणी केली


वाऱ्यांचा प्रचंड वेग


ब्रिटनमधून अर्जेंटिनाला भेट देणार्‍या 25 वर्षीय क्लोरे येओमन्स यांनी बीबीसीला सांगितलं की, स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजता मध्य ब्यूनस आयर्समधील तिच्या अपार्टमेंटमध्ये असताना वादळी वारे होते. तिने पुढे सांगितलं की, "या वाऱ्यांचा वेग खूप होता. माझ्या आयुष्यात वाऱ्याचा इतका जोरदार आवाज, मी कधीच ऐकला नव्हता. मग मला कारचा अलार्म आणि बाहेरील आवाज घरात ऐकू येत होता. तो चक्रीवादळाचा आवाज होता. मला इमारत हादरल्याचं जाणवलं. मी अपार्टमेंटच्या दुसऱ्या बाजूला गेले आणि बाथरुममध्ये बसले. मला भीती होती की, माझ्या बाल्कनीवर एखादं झाड पडेल."