Earthquake in North Central Japan : नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत सुरु असतानाच आज सोमवारी (1 जानेवारी) उत्तर मध्य जपानमध्ये7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला आहे. जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.





होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवरने सांगितले की ते त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये तपासणी केली जात आहे, असे जपानी सार्वजनिक प्रसारक NHK टीव्हीने वृत्त दिले आहे. जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीने इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांमध्ये भूकंप झाल्याची माहिती दिली, त्यापैकी एकाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी होती.






जपान भूकंप : आतापर्यंत काय माहिती मिळाली?



  • NHK TV ने इशारा देत सांगितले की, पाण्याचा प्रवाह 5 मीटर (16.5 फूट) पर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांना शक्य तितक्या लवकर उंच जमिनीवर किंवा जवळच्या इमारतीच्या टेरेसवर धावत जावे. 

  • 1 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा इशिकावा प्रीफेक्चरमधील वाजिमा सिटीच्या किनारपट्टीवर आदळल्या

  • "सर्व रहिवाशांनी ताबडतोब उंच जमिनीवर जाणे आवश्यक आहे," राष्ट्रीय प्रसारक NHK टीव्हीने सांगितले. इशिकावा प्रीफेक्चरमधील नोटो प्रदेशात भूकंप झाला.

  • जपानमधील 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर पूर्व किनारपट्टीच्या काही भागांमध्ये समुद्राची पातळी वाढू शकते, असे दक्षिण कोरियाच्या हवामान संस्थेने म्हटले आहे.

  • कंसाई इलेक्ट्रिक पॉवरच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्या त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये कोणतीही गंभीर स्थिती नाही. परंतु, कंपनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

  • 11 मार्च 2011 रोजी ईशान्य जपानला मोठा भूकंप आणि त्सुनामी आली, शहरे उद्ध्वस्त झाली होती




इतर महत्वाच्या बातम्या