Nostradamus Predictions 2024: जगभरात आतापर्यंत अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. बाबा वेंगा (Baba Vanga) किंवा नॉस्टरडेमस (Nostradamus) यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत अनेकांना आकर्षण आहे. त्यांनी हजारो वर्षांआधीच भविष्यात काय होऊ शकेल, याबाबात भाकितं केली आहेत. ही भाकितं पुढे जाऊन खरी देखील ठरली.
बाबा वेंगा किंवा नॉस्टरडेमस यांनी हिटलरचं भाकीत, हिरोशिमा-नागासाकीबाबत भाकीत, न्युक्लिअर हल्ला आणि महायुद्धाबाबत अनेक भाकितं केली होती, जी पुढे येणाऱ्या काळात खरी देखील ठरली. आधीच पुढे होणाऱ्या घटना जाणून घेण्याच्या मानवी वृत्तीमुळे अनेकांनी भविष्यकारांनी सांगितलेली भविष्य वाचायला आवडतात. सध्या ब्राझिलमधील असाच एक माणूस त्याच्या भविष्यवाण्यांसाठी नावाजला जातो. एथोस सलोम (athos salome) असं त्याचं नाव असून त्याला प्रसिद्ध भविष्यकार नॉस्टरडेमस यांची उपमाही दिली जाते.
एथोसला लिव्हींग नॉस्टरडेमस (Living Nostradamus) असंही म्हणतात, तो केवळ 37 वर्षांचा असून त्याने केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या देखील झाल्याचं बोललं जातं. यात मागील वर्षी झालेलं महाराणी एलिझाबेथ II चं निधन, ट्विटरचं झालेलं रुपांतर यासह अनेक भविष्यवाण्यांचा समावेश आहे.
तिसऱ्या महायुद्धाचा धोका
2024 मध्ये दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढू शकतो, असं एथोस सलोम याने सांगितलं, यामुळे जागतिक संकट निर्माण होण्याचा धोका आहे. 2024 च्या तिमाहीत अमेरिका, चीन आणि रशियामध्ये संघर्ष होऊ शकतो. नाटो आणि सीएसटीओ देखील या संघर्षात सामील होऊ शकतात. हे प्रकरण पुढे जागतिक संघर्षात बदलू शकतं, असं भाकीत एथोस सलोम याने केलं आहे.
रशिया आणि युक्रेन वाद चिघळणार
2024 च्या मध्यात रशिया आणि युक्रेन सीमेवर संघर्ष वाढू शकतो. युरोपियन संघाचे देश आणि अमेरिकेने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतल्यास तणाव आणखी वाढू शकतो, असं भाकीत एथोस सलोम याने वर्तवलं आहे.
मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशियात संघर्ष
अंतर्गत कलहामुळे मध्य पूर्वात अस्थिरता निर्माण होईल. आफ्रिकन देश लिबिया, सुदान आणि नायजेरियासारख्या देशांमध्ये नैसर्गिक संसाधनांवरुन संघर्ष होऊ शकतो. आशियाई देशांबद्दल बोलायचं झालं तर, भारत आणि पाकिस्तान तसेच कोरियातही चिंता असू शकते.
हवामान ढासळणार?
2024 मधील हवामानाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यात तरुण अधिक लक्ष देतील, असं एथोसनं म्हटलं आहे.
अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान बदल
2024 मध्ये तंत्रज्ञान अधिक विकसित होईल. मूलभूत जागतिक चलनांमध्ये देखील बदल होईल आणि महागाई देखील वाढेल, असं भाकीत एथोस सलोमने वर्तवलं आहे.
या देशांवर लक्ष केंद्रित केलं जाणार
2024 मध्ये भारत, आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया आणि अमेरिकेत मोठ्या घटना घडतील. एथोसने प्रगतीच्या आशेने भारताचं 'टायगर' असं वर्णन केलं आहे. फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि चीन यांसारख्या आशियाई देशांना वादळाचा धोका आहे. दरम्यान, अमेरिकेत प्रादेशिक स्तरावर, कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टनमध्ये जंगलात विनाशकारी आग पसरू शकते.
रोगराईचा धोका
2024 या वर्षी आरोग्य क्षेत्राशी संबंधित आपत्तीसाठी तयार राहणं महत्त्वाचं आहे. रुग्णालयांनी तयारी केली पाहिजे आणि चांगल्या यंत्रणा कार्यान्वित केल्या पाहिजे. येत्या काही वर्षांत रोग आणि साथीचे रोग उद्भवू शकतात, असं भाकीत देखील एथोस सलोमने केलं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: