वॉशिंग्टन : अमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता असल्याने या महासत्तेचा प्रमुख नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. या प्रमुखाच्या निर्णय प्रक्रियेकडेही साऱ्या जगाचं लक्ष असतं. पण यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. ते कारण म्हणजे, ट्रम्प यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची केलेली प्रशंसा.


आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्ट्रोवर्सीचे बादशाह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा केली. त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला ''ब्युटिफूल'' म्हणजे सुंदर आणि ''इन सच अ गूड शेप'' म्हणत ब्रिगिट मॅक्रोन यांच्या फिगरविषयी धक्कादायक वक्तव्य केलं.

ट्रम्प यांचा कॉम्प्लिमेंट देतानाचा फेसबुक लाईव्ह व्हिडीओ गुरूवारी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. या व्हिडीओत उभय नेते आणि त्यांच्या पत्नी ले इन्वेलाईद्समधील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर चर्चा करत असताना दिसत आहेत.

या भेटीत ट्रम्प आणि मॅक्रोन दाम्पत्य एकमेकांचा निरोप घेत होते. त्यावेळी ट्रम्प यांनी ब्रिगित मॅक्रोन यांना ही कॉम्पिमेंट दिली. ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेनं एरवी राजकीयदृष्ट्या धक्कादायक वक्तव्य करणारे, ट्रम्प आता फिजिकल अपीअरन्ससंदर्भात वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत.

व्हिडीओ पाहा