थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. थायलंडमधल्या फुकेट या शहरात  71 वर्षीय रॉजर हुसै विसीबली आपल्या पत्नीसह पॅरासिलिंग करण्यासाठी गेले होते.

मात्र आकाशात झेपावल्यानंतर अवघ्या 18 सेकंदांमध्ये रॉजर हे समुद्रात कोसळले.

त्यांना तातडीनं जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

याप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.

हा सर्व अपघात समुद्र किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांनी शूट केला. रॉजर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीनं तो सोशल मीडियावर पोस्ट केला.