US San Francisco Khalistan Supporters: अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ल्याची घटना घडली आहे. अमेरिकेच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 1.30 ते 2.30 च्या दरम्यान हा हल्ला झाला.खलिस्तानींनी (Khalistani)  भारतीय दूतावासाला टार्गेट केलं आहे. अग्निशमन दलाने ही आग लगेच विझवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता.


रिपोर्टनुसार, आगीमुळे फारसे नुकसान झाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.  या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला. खलिस्तानी समर्थकांनी या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे. मात्र अद्याप भारतीय दूतावासाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 






अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ट्विट केले की, सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाची तोडफोड आणि जाळपोळ करण्याचा जो  प्रयत्न झाला त्याचाा अमेरिका तीव्र निषेध करते.   तोडफोड किंवा हिंसाचार  करणाऱ्यांवर  कडक कारवाई करण्यात येणार आहे 







खलिस्तान समर्थक निदर्शकांच्या एका गटाने मार्चमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केल्याच्या काही महिन्यांनंतर ही घटना घडली आहे. मार्चमध्ये झालेल्या घटनेचा भारत सरकार आणि भारतात स्थायिक असलेल्या अमेरिकन नागरिकांनी तीव्र निषेध केला होता. हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भारतीय दूतावासाला टार्गेट करण्यात आलं आहे.


अमेरिकेच्या दूतवासावर करण्यात आलेल्या हल्ल्यामागे खलिस्तानी समर्थक असल्याचा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी एक व्हिडीओ जारी करत हल्ला करण्याचे कारण सांगितले आहे. मात्र हा व्हिडीओ खरा आहे की नाही याबबत याची खात्री झालेली नाही.कॅनडामध्ये  हरदीप सिंहची गोळी मारुन हत्या करण्यात आली. या हत्येचा निषेध म्हणून अमेरिकेतील भारतीय दूतावासावर हल्ला केल्याचे  खलिस्तानी समर्थकांनी म्हटले आहे. 


हे ही वाचा :


Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात गोळ्या झाडून हत्या