US Independence Day, Statue of Liberty : अमेरिकेला  4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्य मिळालं. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (Statue of Liberty) जगभरात प्रसिद्ध आहे. जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेला हा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक आहे. आजच्या दिवशी म्हणजे 4 जुलै रोजी फ्रान्सने अमेरिकेला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार करण्याचं काम अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी मिळून केलं होतं. या पुतळ्याचा पाया अमेरिकेने बांधला होता, तर पुतळ्याचा वरचा भाग फ्रान्समध्ये तयार करण्यात आला होता. 


आजच्या दिवशी अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं


फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिला होता. 4 जुलै 1776 रोजी संयुक्त राज्य अमेरिकेला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्सने अमेरिकेला ही 'ग्रेट' भेट दिली होती. फ्रान्सने 1876 मध्ये अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट दिला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक मानलं जातं. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'चा अर्थ स्वातंत्र्याचा पुतळा असं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सुमारे 136 वर्ष जुना आहे. 1984 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.


स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रान्सकडून अमेरिकेला भेट


4 जुलै 1776 या दिवशी फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट दिला होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्क बंदरात स्थित 'द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' हे स्वातंत्र्य आणि मैत्रीचं प्रतीक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी फ्रान्सच्या जनतेच्या वतीने ही भेट स्वीकारली. या पुतळ्याला आधी 'लिबर्टी एनलाइटनिंग द वर्ल्ड' असं म्हटलं जात होतं. या प्रचंड पुतळ्याची पोलादी रचना दोन प्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद युजीन इमॅन्युएल व्हायोले ले डक आणि अलेक्झांडर-गुस्ताव्ह आयफेल यांनी तयार केली होती. यांनीच पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची रचनाही केली होती.


'ही' आहे पुतळ्याची खासियत


स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळा फ्रान्समध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर ते भाग अमेरिकेत आणून हा भव्य पुतळा निर्माण करण्यात आला. मे 1884 मध्ये, हा पुतळा फ्रान्समध्ये पूर्ण झाला. जून 1885 मध्ये सुमारे 300 तुकड्यांमध्ये  असलेला हा पुतळा अमेरिकेत आणण्यात आला. न्यूयॉर्क हार्बरमध्ये याचे भाग जोडून 151 फुटांचा पूर्ण पुतळा उभारण्यात आला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे वजन 204,117 किलो इतकं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मूर्तीचं वजन अंदाजे 250,000 पौंड आहे. हा पुतळा तयार करताना शुद्ध तांबे आणि स्टीलचा वापर करण्यात आला आहे.


स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पूर्ण नाव लिबर्टी एनलाइटनिंग द वर्ल्ड असं आहे. रोमन पौराणिक कथांमध्ये स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या रोमन देवी लिबर्टासच्या नावावरून या पुतळ्याचं नाव देण्यात आलं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चप्पलेचा आकार 879 असून हा सामान्य महिलांपेक्षा 98 पट अधिक आहे.


हिरव्या रंगाचं कारण आहे हवामान


स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळा शुद्ध तांब्यापासून तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याचा मूळ रंग तपकिरी होता. पण, बदलत्या वातावरणामुळे पुतळ्याच्या बाहेरील तांब्याच्या आवरणावर कपर कार्बोनेट तयार होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे याचा रंग बदलला. पुतळा स्थापन झाल्यानंतर 30 वर्षांनी हा बदल जाणवू लागला. कॉपर कार्बोनेटमुळे आता हा पुतळा हिरव्या रंगाचा दिसतो.


बाल्कनीकडे जाण्यासाठी 354 पायऱ्या 


या पुतळ्याच्या डोक्यावरील मुकुटामध्ये बाल्कनी आहे. अनेक पर्यटक येथे भेट देतात. तुम्हाला पुतळ्याच्या माथ्यावरील बाल्कनीमध्ये पोहोचायचं असल्यास 354 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढण्यासाठी सरासरी 30 ते 40 मिनिटे लागतात. दिवसभरात फक्त 240 पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला भेट देण्याची परवानगी दिली जाते. याशिवाय दिवसभर बाल्कनीमध्ये जाण्यासाठी ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी पर्यटकांना 10 लोकांच्या गटांमध्ये विभागलं जातं आणि त्यांना वेळेचे मर्यादा दिली जाते.


मुकुटाचे वेगळं महत्त्व


स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याच्या मुकुटावर 7 अणकुचीदार टोकं आहेत आणि याचा वेगळा अर्थ आणि महत्त्व आहे. हे स्पाइक्स जगातील 7 महाद्वीपांचे प्रतिक असून प्रत्येक स्पाइकची लांबी 9 फूट आणि वजन सुमारे 150 पौंड आहे. मुकुटामध्ये 35 खिडक्या आहेत.


स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मशाल


हा पुतळा प्रज्वलित मशालीसाठी ओळखला जातो, पण आता त्यात ठेवलेली मशाल केवळ शोभेसाठी आहे. 1984 मध्ये हवामान खराब झाल्यामुळे येथील ज्वलंत मशाल बंद करण्यात आली आणि शोभेच्या मशालीची नवीन रचना करण्यात आली आहे. मूळ मशाल पर्यटकांना पाहण्यासाठी लिबर्टी संग्रहालयात आहे.