Omicron Update : लसीचा बुस्टर डोस घेतला असला तरी गर्दी टाळा, असं आवाहन व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी दिला आहे. फाऊची यांनी 40 पेक्षा जास्त लोकांची गर्दी टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लसीचे दोन डोस आणि वर बूस्टर घेतला असला तरी ते सुरक्षित नसतात असं फाऊची यांनी म्हटलं आहे. दरम्यान भारतात देखील ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहून केंद्राकडून राज्यांना काही आदेश देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी लावण्यासह गर्दीच्या कार्यक्रमांना, ठिकाणांवर निर्बंध आणावेत असं केंद्राकडून राज्यांना सांगण्यात आलं आहे.
डॉ. अँथनी फाऊची यांनी गर्दी न करण्याबाबत सल्ला देताना म्हटलं आहे की, COVID-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले लोक सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबासोबत एकत्र येऊ शकतात. पण असं एकत्र येणं सुरक्षित नाही, ज्यांना बूस्टर डोस मिळाला आहे त्यांच्यासाठीही एकत्र येणं सुरक्षित नसल्याचं डॉ. अँथनी फाऊची यांनी सांगितलं आहे.
युनायटेड स्टेट्समध्ये नागरिक ख्रिसमसच्या निमित्तानं सुट्ट्यांचा प्लान करत आहेत. मात्र कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉन व्हायरसमुळं देशात अनेकांना प्रवास रद्द करण्यास, प्रियजनांना भेट देण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डॉ. अँथनी फाऊची यांनी म्हटलं आहे की, बऱ्याच ठिकाणी जिथं 30, 40, 50 लोक आहेत. तिथं आपल्याला अन्य व्यक्तिंच्या लसीकरणाबाबत माहिती नसते. त्यामुळं ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी जाणं टाळावं.
दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंडमधील अभ्यासांचा हवाला देऊन फाऊची म्हणाले की, ओमायक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमी गंभीर असल्याचे प्राथमिक अभ्यासावरुन लक्षात येतं, परंतु अमेरिकन लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. ओमायक्रॉनच्या संसर्गात रुग्णांच्या प्रमाणात ही वाढ आम्हाला अपेक्षित आहे आणि आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत, असं ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं : अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha