Zero Hour Full : ठाकरे गटासाठी राज इन, मविआ आऊट? ठाकरेंना आता काँग्रेस नकोशी झालीये?

Zero Hour Full : ठाकरे गटासाठी राज इन, मविआ आऊट? ठाकरेंना आता काँग्रेस नकोशी झालीये?

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनसे आणि उबाठा गट हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राज ठाकरेंसमोर युतीसाठी हात समोर केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसला तरी ठाकरे गटाकडून मनसेशी (MNS) युती करण्यासाठी सर्वप्रकारची तयारी दाखवली जात आहे. कारण, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेशी युती करण्यासाठी गेली काही वर्षे सोबत असलेल्या मविआ आघाडीशी (Mahavikas Aghadi) काडीमोड घेण्याचे संकेत दिले आहेत. मविआ आणि इंडिया आघाडी या अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरणं वेगळी असतात, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात. आघाडी करायची की नाही, हा निर्णय त्यावेळी  घेतला जाईल. स्वबळावर तयारी सगळेच पक्ष करत असतात, आमचीही तयारी सुरु आहे. कोणी काहीही बोललं तरी हायकमांड यावर निर्णय घेईल, असे नाना पटोले यांनी म्हटले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola