नवी दिल्ली : महिलांना योग्य स्थान देऊ असं तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यावर म्हटलं होतं. पण त्यांचे हे उद्गगार खोटे असल्याचेच सतत सिद्ध होत आहे. सत्ता मिळाल्यानंतर महिलांवर अत्याचार सुरूच राहिलेत आणि आता तर तालिबान्यांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे. अफगाणिस्तानच्या  ज्युनिअर महिला राष्ट्रीय व्हॉलीबील संघाच्या खेळाडूचा त्यांनी शिरच्छेद केला आहे. 


संघाच्या प्रशिक्षकाने पर्शियन इंडीपेंडंटशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, महजबीन हकिमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर कुटुंबाला धमकावण्यात आलं होतं. यामुळे हत्येची माहिती समोर आली नव्हती.


महजबीन काबुल नगरपालिका व्हॉलीबॉल क्लबसाठी खेळत होती. महजबीन संघाच्या स्टार खेळाडूंपैकी एक होती. काही दिवसांपूर्वी शिरच्छेद केलेल्या महजबीनच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. टीमच्या प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये जेव्हा तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर महिलांच्या हक्कांना डावललं जात आहे. अफगाणिस्तानतील प्रत्येक खेळ संकटात आहे. त्यामध्ये सर्वात जास्त महिला खेळाडूंचे हाल होत आहे. महिला खेळाडूंना देश सोडावा लागत आहे किंवा शांत राहावे लागते.


दरम्यान काही दिवसापूर्वी फिफाने अफगाणिस्तानातील अनेक महिला- पुरूष खेळाडूंना तसेच त्यांच्या कुटुंबियांनी सुरक्षित बाहेर काढले होते. काबुलवरून या सर्वांना कतारला नेण्यात आले होते. तालिबानने सत्तेत आल्यानंतर महिलांवर अनेक निर्बंध लावण्यास सुरूवात केले. यामध्ये महिलांन महाविद्यालयात जाऊन मुलांसोबत शिक्षण घेणे, नोकरी करणे अशा अनेक ठिकाणी महिलांवर निर्बंध लावले होते. 


संबंधित बातम्या :


US Help Afghanistan : अमेरिका अफगाणिस्तानला 470 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार, संयुक्त राष्ट्र अन् न्यूझीलंडकडूनही घोषणा


Taliban News: अफगाणिस्तानच्या विद्यापीठांमध्ये महिला शिक्षण घेऊ शकतील, पण तालिबानच्या अटींचं पालन करुन