एक्स्प्लोर
एअर इंडियाचं अंकारात इमर्जन्सी लँडिग, 250 भारतीय प्रवासी अडकले
अंकारा : एअर इंडियाच्या लंडन-मुंबई विमानाचं तुर्कस्तानची राजधानी अंकारामधे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. काल प्रवाशांना मेडिकल इमर्जन्सी असल्यांचं सांगण्यात आलं. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्यानं जवळपास 250 भारतीय अजूनही अंकारा विमानतळावर अडकलेले आहेत. विमानातील 250 प्रवाशांमधील 50 ते 60 प्रवासी महाराष्ट्रातील आहेत.
गुरुवारी लंडनहून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचं अंकारात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानातील प्रवाशांना विमानतळावर उतरवण्यात आलं आणि लवकरच पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं. मात्र त्यांची कोणतीही व्यवस्था एअर इंडियानं केली नाही.
दरम्यान गेल्या 34 तासांपासून अंकारात अडकलेल्या प्रवाशांनी कुठल्याही प्रकारची पर्यायी सोय एअर इंडियाकडून करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जेवण,व्हिजा कुठलीच सोय देण्यात आली नसल्यानं 24 तास हे सर्व प्रवासी विमानतळावरच अडकले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement