एक्स्प्लोर

भारतानंतर हे देशही नोटाबंदीच्या तयारीत

नवी दिल्ली : भारतात झालेल्या नोटाबंदीची चर्चा केवळ देशातच नाही, तर जगभर सुरु आहे. भारताशिवाय तीन असे देश आहेत, जिथे कोणत्या ना कोणत्या प्रकारे नोटाबंदी केली जाणार आहे. पाकिस्तानातून सर्वात मोठी नोट चलनातून बाद काळ्या पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्ताननेही भारताकडून धडा घेतल्याचं चित्र आहे. पाकिस्तानच्या संसदेत 5000 रुपयांची नोट चलनातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये काळा पैसा रोखण्यासाठी 5000 रुपयांची नोट बंद करण्यात येणार आहे. भारताने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दीड महिन्यातच पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे. मुस्लीम लीगचे उस्मान सैफुल्लाह खान यांनी हा प्रस्ताव मांडला, जो बहुमताने पारित करण्यात आला.

भारतानंतर पाकिस्तानातही आता नोटाबंदीचा निर्णय

पाकिस्तानमध्ये 5 हजारच्या नोटांची संख्या एकूण चलनाच्या 30 टक्के एवढी आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या विरोधानंतरही जनरल परवेज मुशर्रफ सरकारने 5 हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. ऑस्ट्रेलियातही नोटाबंदीची शक्यता भारतानंतर ऑस्ट्रेलियादेखील लवकरच नोटाबंदी करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 100 ऑस्ट्रेलियन डॉलरची नोट रद्द करण्यासाठी समिक्षा सुरु केली आहे. ही नोट बंद केल्यास काळा पैसा बाहेर काढता येईल, तसेच गैरव्यवहार थांबतील, असं ऑस्ट्रेलिया सरकारचं म्हणणं आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व बँकेने या निर्णयाला विरोध केला आहे. या नोटांमुळे गैरव्यवहार होत असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व बँकेने स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियन गुन्हे आयोगाच्या म्हणण्यानुसार गैरव्यवहारासाठी 100 डॉलर नोटेपेक्षा सर्वात जास्त उपयोग 50 डॉलरच्या नोटेचा केला जातो. ऑस्ट्रेलियात सध्या 50 आणि 100 डॉलर नोटांची संख्या एकूण चलनाच्या 66 टक्के एवढी आहे. व्हेनेझुएलामध्येही नोटाबंदी व्हेनेझुएला सरकारने 12 डिसेंबर रोजी 100 बोलिवरची नोट चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केला. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

व्हेनेझुएलात नोटाबंदीने हाहाकार, आठवड्याभरात निर्णय मागे

दरम्यान व्हेनेझुएलामध्ये या निर्णयामुळे आर्थिक संकट असल्याचं चित्र असून महागाई दरही वाढला आहे. व्हेनेझुएलामध्ये सध्या एकूण चलनाच्या 50 टक्के एवढ्या 100 बोलिवरच्या नोटा आहेत. व्हेनेझुएलामध्ये नव्या नोटांचा पुरवठा न झाल्यामुळे सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नोटाबंदीनंतर व्हेनेझुएलामध्ये अनेक हिंसक घटनाही घडल्या. भारत आणि इतर देशांच्या नोटाबंदीची तुलना लोकसंख्येनुसार भारत या देशांपेक्षा सर्वात मोठा देश आहे. भारतात 130 कोटी लोकसंख्या आहे, तर 500 आणि एक हजारच्या एकूण नोटा 86 टक्के एवढ्या आहेत. तर पाकिस्तानची लोकसंख्या 20 कोटी आहे, तर बंद करण्यात येणाऱ्या नोटांची संख्या एकूण चलनाच्या 30 टक्के आहे. व्हेनेझुएलाची लोकसंख्या 3 कोटी आहे. तर तिथे बंद करण्यात आलेल्या नोटांची संख्या 50 टक्के आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.3 कोटी आहे, तर प्रस्तावितपणे बंद करण्यात येणाऱ्या नोटांची संख्या 66 टक्के आहे.

महत्त्वाच्या बातम्या

होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
पैसे वसूल तरीही कारवाई सुरुच राहणार! ईडी पुन्हा मल्ल्याभोवती फास आवळणार! नेमकं प्रकरण काय?  
पैसे वसूल तरीही कारवाई सुरुच राहणार! ईडी पुन्हा मल्ल्याभोवती फास आवळणार! नेमकं प्रकरण काय?  

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
Embed widget