Ukraine President Zelensky Urges PM Modi : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine President Zelensky)आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र (PM Narednra Modi) मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. खुद्द राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करून ही माहिती दिली. नेमकं काय बोलणं झालं झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये?
"भारताकडून सहभागाची अपेक्षा"
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. झेलेन्स्की म्हणाले की त्यांच्या शांतता सूत्राच्या अंमलबजावणीत भारताच्या सहभागाची अपेक्षा आहे. भारताच्या G20 च्या यशस्वी अध्यक्षपदासाठी त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या तसेच संयुक्त राष्ट्रात युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानले आहेत.
"G20 च्या यशस्वी अध्यक्षपदासाठी शुभेच्छा!" झेलेन्स्की यांचे ट्विट
झेलेन्स्की यांनी ट्विट केले की, “मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना G20 च्या यशस्वी अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच याच मंचावर त्यांनी 'शांतता फॉर्म्युला' जाहीर केला. आता याच्या अंमलबजावणीत भारताच्या सहभागाची अपेक्षा करतो. झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्र संघातील पाठिंबा आणि समर्थनाबद्दल आभार मानले. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र येथे मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत आणि पाठिंब्यासाठी भारताचे आभार मानले. व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट केले की, "संयुक्त राष्ट्रांमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो." दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली होती.
"भारत योगदान देण्यास तयार" - पंतप्रधान मोदी
फेब्रुवारीमध्ये युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच झेलेन्स्की यांच्याशी अनेकदा बोलले आहेत. 4 ऑक्टोबर रोजी झेलेन्स्की यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात मोदी म्हणाले की "भारत कोणत्याही शांतता प्रयत्नात योगदान देण्यास तयार आहे. युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही. संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.