Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान (Afghanistan) मधील विनाशकारी भूकंपांमध्ये सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये अनेक नागरिक बचावल्याच्या घटना समोर येत आहेत. आता बचाव पथकाने सुमारे 36 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अवघ्या काही महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढलं आहे. या चिमुकलीनं मृत्यूलाही चकवा दिला आहे.
भूकंपाच्या 36 तासांनंतरही बाळं सुखरूप
अफगाणिस्तानमध्ये 'जाको राखे सैयां मार सके ना कोई' ही म्हणही खरी ठरली आहे. शेकडो टन वजनाच्या ढिगाऱ्याखालून एक चिमुकली सुखरूप बचावल्याची घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये येथील हेरत प्रांतात (Herat Province) मंगळवारी ढिगाऱ्याखालून अवघ्या काही महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. मृत्यूवर मात केलेल्या या चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप
अफगाणिस्तानमधील शक्तिशाली भूकंपांमुळे मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भुकंपामुळे 10,000 हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती तालिबान प्रशासनाने दिली आहे. अफगाणिस्तानच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपापैकी हा एक असल्याचं सांगितलं जात आहे. हेरात शहराच्या वायव्येस भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती, अशी माहिती यूएस भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने दिली आहे.
अनेक गावे उदध्वस्त
हेरात प्रांतातील अनेक गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, यामध्ये सुमारे 600 घरांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ढिगाऱ्याखाली शेकडो नागरिक अद्यापही गाडले गेले आहेत, तालिबान सरकारने तातडीने मदतीची मागणी केली आहे. तालिबानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, 'आम्ही आमच्या श्रीमंत देशबांधवांना आपल्या पीडित बांधवांना शक्य ते सर्व मदत देण्याचे आवाहन करतो.'
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी 7 ऑक्टोबरला अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम भागात होता.
महत्वाच्या इतर बातम्या :
Earthquake : अफगाणिस्तानमधील भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली! आता भारताला विनाशकारी भूकंपाची भीती; चर्चांना उधाण