Afghanistan Earthquake Update : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) मोठा भूकंप झाला (Earthquake Update) असून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये आतापर्यंत हजारो लोक ठार झाले असून जखमींची संख्या देखील मोठी आहे. अद्यापही अफगाणिस्तानमध्ये बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची आहेत, अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे हादरे
अफगाणिस्तानमध्ये शनिवारी 7 ऑक्टोबरला भूकंपाचे हादरले बसले. पाच मोठा भूकंपाचे हादरे बसल्यानंतर ऑफ्टरशॉकमुळे अनेक गावं उदध्वस्त झाली आहेत. शनिवारी अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात 4,000 हून अधिक लोक ठार झाले आहेत, असं अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्वात शक्तिशाली भूकंप 6.3 रिश्टर स्केलचा होता तर दोन भूकंप 6.2 रिश्टर स्केलचे होते. या भूकंपांमध्ये सुमारे 2,000 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ANDMA) दिली आहे.
भूकंपात 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू
अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (Afghanistan National Disaster Management Authority) म्हणजे ANDMA प्रवक्ते मुल्ला सैक यांनी एका पत्रकार परिषदेत भूकंपानंतरच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "आतापर्यंत आम्हाला अपघाती बळींची मिळालेली आकडेवारी दुर्दैवाने 4,000 च्या पुढे गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील 20 गावांमध्ये अंदाजे 1980 ते 2000 घरे पूर्णपणे कोसळली आहेत."
हेही वाचा : अफगाणिस्तानमधील भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली! आता भारताला विनाशकारी भूकंपाची भीती; चर्चांना उधाण
अनेक वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप
तालिबान प्रशासनाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंप अनेक वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंपापैकी एक आहे. शनिवारी सकाळी 7 ऑक्टोबरल अफगाणिस्तानच्ये पश्चिमेकडील शहरांमध्ये भूकंप झाला. हेरास, बडघिस आणि फराह प्रांतात भूकंपाचे जोरदार हाररे बसले आहेत. भूकंपाचा धक्का मुख्यतः देशाच्या पश्चिम भागाला बसला, पण याचा काहीसा परिणाम शेजारील इराणमध्ये जाणवला. हा भूकंप अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दशकांतील सर्वात भीषण भूकंपांपैकी एक आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने सांगितल्याप्रमाणे, या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती.
महत्वाच्या इतर बातम्या :