Kabul Mosque Blast:  बुधवारी काबूलमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीत झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या राजधानीत आठवडाभरातील हा दुसरा स्फोट आहे. याआधी रविवारी झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता तर 59 जण जखमी झाले होते. काबूलच्या लष्करी कमांडरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कोणीतरी मशिदीवर ग्रेनेड फेकल्याने हा स्फोट झाला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. थंडीच्या महिन्यांत तुलनेने कमी हिंसाचारानंतर हा स्फोट झाला असल्याचे ते म्हणाले.


सत्ताधारी इस्लामिक तालिबानचे म्हणणे आहे की, त्यांनी ऑगस्टमध्ये सत्ता स्थापन केल्यापासून देश सुरक्षित केला असून बहुतेक लढाई संपली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे की, बंडखोरीचे पुनरुत्थान होण्याचा धोका आहे. तसेच इस्लामिक स्टेट जिहादी गटाने अनेक मोठ्या हल्ल्यांचा दावा केला आहे. यामध्येच चीनच्या अहुई प्रांतातील तुन्शी येथे अलीकडेच अफगाणिस्तानच्या शेजारी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची तिसरी बैठक पार पडली. यात चीन, इराण, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या बैठकीत TAPI गॅस पाइपलाइन प्रस्ताव, भारतातून अफगाणिस्तानला गव्हाचा पुरवठा आणि इराणमधील चाबहार बंदराचा विकास, युद्धग्रस्त अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी हाती घेतलेल्या आर्थिक पुनर्बांधणी प्रकल्पांवर चर्चा झाली. या बैठकीसाठी भारताला निमंत्रित करण्यात आले नसले तरी परिषदेच्या प्रस्तावनेत भारताने उचललेल्या आर्थिक पावलांवर चर्चा करण्यात आली होती.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha