Adar Poonawalla New House : कोरोना काळात (Coronavirus) कोविशील्ड लस (COVISHIELD)  तयार करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) नेहमीच चर्चेत असतात. आता लंडनमध्‍ये घर खरेदी केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत. याआधीही त्यांनी लंडनमध्ये अलिशान घर खरेदी केले होते. रिपोर्ट्सनुसार, अदर पूनावाला यांना या आठवड्यात लंडनमध्ये अलिशान घर खरेदी केलेय. याआधी ते लंडनमध्ये भाड्याच्या घरात राहत होते, त्यासाठी ते प्रत्येक आठवड्याला 50 लाख रुपये भाडे देत होते. आता त्यांनी स्वत:चं घर खरेदी केलेय. याची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल.  


किती रुपयांना खरेदी केले घर ?


अदर पूनावाला यांनी 2023 वर्षातील लंडनमधील सर्वात महागडे घर खरेदी केलेय. रिपोर्ट्सनुसार, 42 वर्षीय अदर पूनावाला यांनी हाइड पार्कजवळ अलिशान घर खरेदी केलेय. जवळपास एक शतक जुन्या अबरकॉनवे हाऊससाठी अदर पूनावाला यांनी 138 दशलक्ष पौंड म्हणजेच 1,446 कोटी रुपये इतकी किमत मोजली आहे. हे घर याआधी लंडनमधील महापौरांच्या नावावर होते, आता या घराची मालकी अदर पूनावाला यांच्याकडे असेल. 


सीरमसाठी हे घर महत्वाचं का ?


लस तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या खरेदीबाबत CNBC-TV18 या वृत्तवाहिनीला दुजेरा दिलाय.  सुत्रांनी सांगितले की, "हे एक कंपनी गेस्ट हाऊस आहे, ज्याचा वापर इव्हेंट डोनर टेक पार्टनर्ससाठी आयोजित करण्यासाठी केला जाऊ शकतो. सीरम ग्रुपला जागतिक संधी मिळविण्यासाठी यामुळे खूप मदत मिळेल, जी भारतात असताना शक्य नव्हती." दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया विकसनशील देशांसाठी कमी किमतीच्या लसीकरणाचे उत्पादन करून जगातील सर्वात मोठी लस उत्पादक बनली आहे.


लंडनमधील दुसरे महागडे घर - 


लंडनमधील ही मालमत्ता पूनावाला कुटुंबातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची यूकेमधील सहायक कंपनी सीरम लाइफ सायन्सेसद्वारे अधिग्रहित केली जाणार आहे. या करारामुळे अबरकॉनवे हाऊस लंडनमध्ये विकले जाणारे आतापर्यंतचे दुसरे सर्वात महागडे घर ठरले आहे. याआधी लंडनमध्ये सर्वात महागडे घर 2020 मध्ये विकले गेले होते. याची डिल 210 मिलियन पाउंड इतकी झाली होती. हे घर एवरग्रँडे (Evergrande) कंपनीचे फाऊंडर आणि चेयरमन हुई का यान (Hui Ka Yan) यांनी विकत घेतले होते. 


आणखी वाचा : 


कार मेकॅनिकचा मुलगा, ज्याचा पगार दिवसाला 9 कोटी, नेमकं काय काम करतो?


पहिल्यांदाच आमदार ते मुख्यमंत्री, राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंना रिप्लेस करणारे भजन लाल शर्मा कोण?