Chris Hohn : कार मॅकेनिकचा मुलगा अब्जाधीश (Billionaire ) बनला. कमाई एवढी की स्वत:ला रोज तब्बल 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार घ्यायचा. त्यांचं नाव सर ख्रिस होन (Sir Chris Hohn) असे आहे. The Guardian मधील एका अहवालानुसार, ते TCI हेज फंडचे मॅनेजर आहेत. 2023 मध्ये त्यांनी रोजची £1 दशलक्ष पौंड म्हणजे साधारण 9 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. मागील वर्षी त्यांनी जमवलेल्या £574 दशलक्षपेक्षा फक्त अर्धे आहे.
Who is Chris Hohn? कोण आहे ख्रिस होन ?
क्रिस होन यांना मिळेलल्या रक्कमेचा खुलासा कंपनीच्या कागदपत्रात करण्यात आलाय. ख्रिस होन याचे वडिल पेशाने कार मॅकेनिक आहेत. 1960 च्या दशकात ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. ख्रिस होन यांनी 2003 मध्ये टीसीआय सुरु केले. ख्रिस होन यांची कथित संपत्ती 6.2 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) ख्रिस होन जगातील 405 वे श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, ख्रिस होन यांना संडे टाइम्सच्या रिच लिस्टद्वारे (Sunday Times Rich List ) यूकेच्या सर्वात उदार व्यक्ती म्हणून निवडण्यात आले. ख्रिस होन यांनी 2021 मध्ये £755 मिलियन डॉलर दान केले.
Chris Hohn's net worth ख्रिस होन यांची एकूण संपत्ती किती ?
कंपनीज हाऊसच्या खात्यांनुसार, TCI फंड मॅनेजमेंटमधील लाभाच्या पेआउट्स फेब्रुवारी 2023 मध्ये करपूर्व नफ्यात 48% घसरून $371m वर कमी झाले. गार्डियनच्या रिपोर्ट्सनुसार, ही रक्कम यूकेमधील सरासरी पगाराच्या 8,000 पट आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक ( Rishi Sunak as the UK's Prime Minister.) यांनी गोळा केलेल्या रकमेच्या जवळपास 1,700 पट आहे.
ख्रिस होन यांनी मे 2023 मध्ये संडे टाईम्सला मुलाखत दिली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते की, "मी जे पण काम करतो, ती महत्वपूर्ण आहेत. पण मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, मी करत असलेली सर्व कामे जरी महत्त्वाची असली तरी त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक शिक्षण हे आहे. आपल्याला समाजातील स्वार्थाचा प्रश्न सोडवायचा आहे."
ख्रिस होन यांच्या कंपनीत ब्रिटनच्या पंतप्रधानांनीही केलेय काम -
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ख्रिस होन यांच्या कंपनीमध्ये काम केलेय. राजकीय करियर सुरु करण्यापूर्वी सुनक यांनी टीसीआय हेज फंड येथे काम केलेय. 2006 ते 2009 असे तीन वर्ष सुनक यांनी टीसीआय हेज फंडमध्ये काम केलेय.