एक्स्प्लोर

होय, सर्जिकल स्ट्राईक झाला : पाक सुरक्षातज्ज्ञ

नवी दिल्ली:  भारतीय राजकारण्यांकडून सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांविषयी विचारणा होत असतानाच, पाकिस्तानच्या सुरक्षातज्ज्ञ आयशा सिद्धिका यांनी सर्जिकल स्ट्राईकला दुजोरा दिला आहे. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सिद्धिका यांनी एबीपीशी बोलताना स्पष्ट केलं. भारतीय सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच काही पाकिस्तानी सैनिकही यादरम्यान ठार झाल्याचं आयशा यांनी मान्य केलं. त्यांनी भारतीय सैन्याच्या सर्जिकल ऑपरेशनबद्दल काही पुरावे गोळा केले आहेत. ज्या आधारे त्यांनी भारतीय सैनिकांनी केलाला सर्जिकल स्ट्राईक मान्य केला आहे. राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजप सरकार शहिदांच्या रक्ताची दलाली करतंय, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते दिल्लीच्या जंतरमंतवर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. सर्जिकल स्ट्राईक हे सैनिकांचं कर्तृत्व आहे. सैनिक देशासाठी आपलं रक्त सांडतात. सत्तेवर असलेलं मोदी सरकार मात्र त्या शहिदांच्या रक्ताची दलाली करत असल्याची टीका राहुल गांधींनी केली. राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपनं बालिश असं संबोधलं आहे. त्यामुळं सर्जिकल स्ट्राईकवरुन भारतात सुरु झालेलं राजकारण काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे. आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केला, पण गवगवा नाही यूपीए सरकारच्या काळात तब्बल चार वेळा पाकमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, पण आम्ही त्याचा गवगाव केला नाही, असं निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर साधला. ते नागपूरमध्ये बोलत होते. सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरकारचं अभिनंदन पण अशा गोष्टी उघड करायच्या नसतात, असं सांगायलाही शरद पवार विसरले नाहीत. सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलणाऱ्या मंत्र्यांना मोदींनी सावधान केलं ही  चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget