बँकॉक : लहान-मोठे कोणतेही शेफ वेल्डिंग मास्क घालून किचनमध्ये प्रवेश करत नाही. पण सिला सोथ्यूरट कोणतंही इंधन न वापरता सूर्याच्या ऊर्जेवर चिकन शिजवायला आवडतं.


दक्षिण बँकॉकमधील 60 वर्षीय सिला सोथ्यूरट यांचं रस्त्याला लागून हॉटेल आहे. पण ते आपल्या ग्राहकांना थोड्या वेगळ्याप्रकारे जेवण देतात. सौरऊर्जेचा वापर करुन शिजवलेलं अन्न ते ग्राहकांना वाढतात.

हलवता येणारी एक हजार आरशांची भिंत वापरुन सिला सोथ्यूरट चिकन शिजवतात. ही भिंत त्यांनी स्वत:च डिझाईन आणि बनवली आहे. आरशांच्या भिंतीद्वारे सूर्यकिरण मॅरिनेट केलेल्या चिकनवर पडतं आणि तीव्र उष्णतेने चिकन शिजतं.

"ही अनोखी पद्धत वापरुन सौरऊर्जेवर चिकन शिजवण्याची कल्पना ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. अनेकांनी मला वेडं ठरवलं. अशाप्रकारे चिकन शिजवणं अशक्य असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण जसजशी वेळ निघून गेली, लोक म्हणाले, खरंच तू ही कल्पना सत्यात उतरवलीस," असं सिला सोथ्यरट यांनी सांगितलं.

ओव्हनला जेवढी उष्णता लागते, तेवढीच तीव्र उष्णता सौर परावर्तक निर्माण करतात. सूर्याच्या ऊर्जेमुळे चिकन अवघ्या 12 मिनिटांत शिजून तयार होतं.

सिला सोथ्यूरट मागील 20 वर्षांपासून आपल्या ग्राहकांसाठी सौरऊर्जेवर शिजवलेलं चिकन वाढतात. पण त्यांचा सोलर कूकरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खवय्ये थायलंडच्या कानाकोपऱ्यातून फेटचाबुरी प्रातांतील त्यांच्या हॉटेलला भेट देत आहेत.

याबाबत बोलताना सिला सोथ्यूरट म्हणाले की, "1997 मध्ये मला ही कल्पना सुचली. एक दिवस बसमधून परावर्तीत झालेलं सूर्यकिरण माझ्यावर डोळ्यावर पडले. खिडकीवर पडलेल्या सूर्यकिरणामुळे उष्णता निर्माण होते, तर त्याचं ऊर्जेत रुपांतर करता येऊ शकतं, असा विचार मी केला."

पारंपरिक कोळशावर शिजणाऱ्या चिकनपेक्षा सौरऊर्जेवर शिजणारं चिकन सगळीकडून समान शिजतं, असा दावाही सोथ्यूरट करतात. तसंच थांयलंड हा उष्णकटिबंधातील हवामान क्षेत्रात येत असल्याने तिथला सूर्यप्रकार स्वच्छ आहे आणि पूर्णपणे ऊर्जेचा स्रोत आहे,

"पेट्रोल आणि गॅस सिलेंडर महाग होतं आणि काही जण लाकडाचीही विक्री करत होते. त्यामुळे मी विचार केला की, सौरऊर्जेचा वापर केल्यास मी बरीच बचत करु शकतो. शिवाय प्रदूषणही कमी होईल," असंही सोथ्यूरट यांनी सांगितंल.

सिला आणि त्यांच्या पत्नी पानस्री आता दरदिवशी 40 चिकन तसंच डुकराचं मांसही शिजवतात.

इथलं चिकन अतिशय रुचकर आहे. शिवाय ते जास्त जळलेलंही नसतं आणि कोळशावर शिजलेल्या चिकनप्रमाणे त्याचा वास येत नाही, अशी प्रतिक्रिया तिथे भेट देणारे ग्राहक देतात. हीच सिला सोथ्यूरट यांच्या अनोख्या कल्पनेला मिळालेली पावती आहे.

पाहा व्हिडीओ

(हा व्हिडीओ AFP चा आहे. इथे प्ले न झाल्यास, लिंकवर क्लिक करा, AFP च्या यू ट्यूब चॅनलवर व्हिडीओ पाहता येईल)