एक्स्प्लोर

9 वर्षांचा चिमुकला, कुत्र्याशी मैत्री आणि सीसीटीव्ही व्हिडीओ

मुंबई: आपल्यातील अनेकजण २४ तास सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. फेसबुक तर सोशल नेटवर्किग साईटवरील सर्वात जास्त अभिव्यक्त होणारे प्रभावी साधन आहे. यावर अनेकजण आपले फोटो, व्हिडीओ रोजच्या रोज अपलोड करत असतात. अन तुमचे मित्र हा फोटो लाईक, किंवा शेअर करून अधिकाधिक प्रसारित करतात. अशाच एका व्हिडीओने सध्या फेसबुक युजर्सना भुरळ पाडलेली आहे. या व्हिडीओत एक मुलगा कुत्र्याशी खेळताना पाहायला मिळत आहे. हॉली ब्रियॉक्स मालेट या अमेरिकेतील फेसबुक युजरने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक प्रोफाईलवर अपडेट केला, आणि पाहता पाहता या व्हिडीओवर अक्षरश: लाईक्स, कमेंटसचा पाऊस पडला. या व्हिडीओमागची कथा मालेट यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर सांगितली आहे. एक नऊ वर्षांचा मुलगा रोज त्या घरी नसताना सायकलवरून येऊन त्यांचा कुत्रा बेलाला रोज प्रेमाने मीठी मारून जायचा. गेले अनेक दिवसांपासून सुरु असलेला हा प्रकार त्यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यामुळे हा मुलगा कोण आणि तो रोज बेलाला का मीठी मारुन जातो ? हा प्रश्न त्यांना पडला होता. त्याचा शोध घेण्यासाठी हा सीसीटीव्ही व्हिडीओ मालेट यांनी फेसबुकवर अपलोड केला. यावर त्यांच्या शेजारच्या महिलेने कमेंट करून तो मुलगा आपला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेच्या घरी जाऊन मालेट दाम्पत्यांनी चौकशी केली. त्याच्याबद्दल ऐकून त्या दोघांनाही धक्का बसला, त्या मुलाचे नाव जोश असे आहे. त्यांच्या घरीही एक पाळीव कुत्रा होता. जोशचे आई-वडील दोघेही नोकरदार असल्याने, रोज सकाळी लवकर उठून कामावर जात. त्यामुळे दिवसभर घरी एकटा असालेल्या जोशची त्यांच्या कुत्र्याशी घट्ट मैत्री झाली. तो रोज त्याच्याशी खेळून आपला एकटेपणा घालवत असे. अचानक एक दिवस त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तो पुन्हा एकलकोंडा बनत होता. त्याला एक दिवस त्याच्या शेजारच्या बेलाचा आधार मिळाला. तो रोज कोणालाही न कळत बिलाशी खेळून त्याला प्रेमाने मीठी मारून जाऊ लागला. हा सर्व प्रकार एकून मालेट दाम्पत्य थक्क झाले होते. हा व्हिडीओ फेसबुकवर सर्वात जास्त चर्चिला जात आहे. या व्हिडीओला तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला आहे, तर याला साडेसहा लाख लाईक्स मिळालेले आहेत. तर 50 हजार कमेंट्स, आणि सव्वा चार लाखांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.   पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget