एक्स्प्लोर

पॅराडाईज पेपर्स : परदेशात काळा पैसा लपवणारे 714 भारतीय कोण?

भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळ्या धनाची यात माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पनामा पेपर प्रकरणानंतर आता पॅराडाईज पेपर्समध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. पॅराडाईज पेपर्समध्ये 1.34 कोटी कागदपत्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळ्या धनाची यात माहिती देण्यात आली आहे. काय आहे पॅराडाईज पेपर प्रकरण? जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील 96 नामांकित माध्यमसमुहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा केला. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता. कर बुडवेगिरी करुन तो पैसा देशाबाहेरील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणाऱ्या भारतीय व्यक्तींची नावं यातून समोर आली आहेत. पत्रकारांना या सर्व प्रकरणाचा शोध घेण्यासाठी 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. यातील सर्वाधिक कागदपत्रे ही अॅपलबाय या विधीविषयक संस्थेशी संबंधित आहेत. 119 वर्षे जुनी असलेली ही कंपनी म्हणजे वकील, अकाऊंटंट्स, बँकर्स आणि अन्य लोकांचं मोठं नेटवर्क आहे. या संस्थेकडून भारतासह जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो. करचोरी केलेला पैसा देशाबाहेर पाठवून काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करणाऱ्या भारतीयांची संख्या 714 एवढी असून भारत जगात 19 व्या क्रमांकावर आहे. कागदपत्रांमध्ये कुणाकुणाचा समावेश? या पेपर्समध्ये महाराणी एलिजाबेथ द्वितीय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही मंत्र्यांसह जगभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावं आहेत. भारतातील 714 व्यक्तींची नावं यामध्ये आहेत. या सर्वांनी परदेशातील कंपन्या आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसा लपवला आहे. अहवालात ज्या 180 देशांचा डेटा देण्यात आला आहे, त्यामध्ये भारत 19 व्या स्थानावर आहे. मोदी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी गेल्या वर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या दोन दिवस अगोदरच हा अहवाल समोर आला आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस सरकारकडून काळेधन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच पनामा पेपर प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचंही नाव होतं. त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Embed widget