नवी दिल्ली : कोरोनाचं संकट रोखण्यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. आता कोरोना व्हायरसच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाची टेस्ट मोफतच केली जाते, मात्र खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाची टेस्ट मोफत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी सरकारने खासगी प्रयोगशाळांना 4500 रुपयांपर्यंत पैसे घेण्याची परवानगी दिली होती.


वकील शशांक देव सुधी यांनी याचिक दाखल करत सरकाररच्या अधिसूचनेला आव्हान दिलं होतं. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणे सरकारची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांच्या टेस्ट होणे गरजेचं आहे. त्यासाठी सरकारी रुग्णालयाप्रमाणे खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाचा तपासणी मोफत झाली पाहिजे, असं या याचिकेत म्हटलं होतं.


कोरोना चाचणी 45 मिनिटात करण्यास सक्षम अशा 10 मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत


सुप्रीम कोर्टाने याचिकेतील मागणी योग्य मानत खासगी प्रयोगशाळांना कोरोनाची टेस्ट मोफत करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत कोरोनाची टेस्ट मोफत झाली पाहिजे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. कोरोना टेस्ट मोफत झाल्यास त्यांचा फायदा होईल आणि कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होईल. सरकार खाजगी प्रयोगशाळांना नंतर भरपाई देणार का हे अजून स्पष्ट नाही. मात्र पुढील सुनावणीत सरकारकडून या प्रयोगशाळांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असं कोर्टाने म्हटलं. मात्र लोकांनी कोरोना टेस्ट मोफत झाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे.


Coronavirrus | राज्यातील आठ खाजगी लॅबना कोरोना तपासणी केंद्राची मान्यता, अमित देशमुखांची माहिती


देशातील 27 खाजगी प्रयोगशाळांना कोरोना टेस्टची मान्यता


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील 27 खाजगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे आठ प्रयोगशाळा महाराष्ट्रातील आहेत. केंद्र शासनाने या खाजगी तपासणी केंद्रांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.


घरबसल्या कोरोनाची लक्षणं ओळखा; विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल


राज्यातील आठ प्रयोगशाळांना मान्यता

  • थायरोकेयर केअर टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (नवी मुंबई)

  • सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रो पोलीस हेल्थकेअर लिमिटेड (मुंबई)

  • सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल (नवी मुंबई)

  • एस आर एल लिमिटेड (मुंबई)

  • ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड (पुणे)

  • कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी

  • मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड ठाणे 


Vaccine on #Corona | कोरोनावरील लस तयार केल्याचा केडिला हेल्थकेअरचा दावा, सध्या प्राण्यांवर चाचणी सुरू