एक्स्प्लोर

ब्ल्यू व्हेल गेमच्या 22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती

सोशल मीडियावर तरुणांशी मैत्री केल्यानंतर फिलीप त्यांचा ब्रेनवॉश करतो. या गेमच्या निर्मितीमागील त्याने सांगितलेलं कारण अत्यंत धक्कादायक आहे. पृथ्वीवरील जैविक कचरा (biological waste) स्वच्छ करण्यासाठी हा घाट घातल्याचं तो सांगतो.

मुंबई : रशियात शेकडो मुलांच्या जीवावर उठलेला 'ब्ल्यू व्हेल' हा ऑनलाईन गेम भारतात हातपाय पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतल्या अंधेरीत 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्यानंतर भारतीय पालक खडबडून जागे झाले आहेत. मात्र या गेमचा मास्टरमाईंड असलेला अवघ्या 22 वर्षांचा तरुण धक्कादायक गोष्टी उघड करत आहे. ब्ल्यू व्हेल चॅलेंज या व्हायरल झालेल्या ऑनलाईन गेममुळे जगभरात अनेक टीनएजर्सनी आपलं आयुष्य संपवलं आहे. विघातक 50 टास्क्स पार केल्यानंतर या गेमचा अंतिम टप्पा म्हणजे सुसाईड. फिलीप बुडेकिन उर्फ फिलीप लिस (फॉक्स) या 22 वर्षांच्या रशियन तरुणाने हा गेम तयार केला आहे. सोशल मीडियावर तरुणांशी मैत्री केल्यानंतर तो त्यांचा ब्रेनवॉश करतो. या गेमच्या निर्मितीमागील त्याने सांगितलेलं कारण अत्यंत धक्कादायक आहे. पृथ्वीवरील जैविक कचरा (biological waste) स्वच्छ करण्यासाठी हा घाट घातल्याचं तो सांगतो.

‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

फिलीपला महिन्याभरापूर्वीच बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठवण्यात आला आहे. साऊंड इंजिनिअरिंग आणि मानसशास्त्राचं तीन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. फिलीपला बायपोलर डिसॉर्डर झाल्याचं निदान आहे. इतकंच नाही, तर लहानपणी आई आणि मोठा भाऊ मारहाण करत असल्याचंही त्याने सांगितलं. 'पृथ्वीतलावर काही माणसं असतात, तर काही जैविक कचरा. त्यांच्यामुळे समाजाला काहीही फायदा होत नाही. अशा व्यक्ती समाजाला त्रासदायकच ठरतात. मी अशा माणसांची समाजातून सफाई करत आहे.' असं फिलीप म्हणतो.

ब्लू व्हेल गेम विधानसभेत, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

किशोरवयीन मुलांना रात्रभर जागरण करायला लावायचं. असं केल्यास त्यांचं मन सहजरित्या प्रभावाखाली येतं, असा दावा फिलीपने केला. त्यांना मायेची ऊब आणि सामंजस्याची वागणूक दिल्याने अशा मुलांना बरं वाटतं, असंही तो म्हणतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक तरुणी त्याला लव्ह लेटर्स लिहित आहेत. सर्व आत्महत्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेममुळे झाल्याचा फिलीपने इन्कार केला. फक्त 17 सुसाईड्सचा थेट संबंध या खेळाशी आहे. मात्र उर्वरित तरुणांनी आपल्या प्रभावाखाली आत्महत्या केली नसल्याचं तो म्हणतो. आणखी 28 मुलं आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचंही त्याने सांगितलं. काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम? ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक ‘मास्टर’  मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.

संबंधित बातम्या

‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

जीवघेण्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे 130 मुलांची आत्महत्या?

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget