जनरल राहील शरीक्ष यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमानंतर पाकिस्तानी मीडियासमोर हा दावा केला.
मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. "14,15 किंवा 16 नोव्हेंबर रोजी भारताचं कोणतंही नुकसान झालं नाही," असं सैन्यातर्फे सांगण्यात आलं आहे.
https://twitter.com/ANI_news/status/799049711030149120
पाकिस्तान लष्करप्रमुखांचा दावा
14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले होते. खुद्द पाकिस्तानच्या लष्करानेही या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र त्यांनी गरळ ओकत भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा कांगावा सुरु केला. पण याच दिवशी भारताच्या 11 जवानांना मारल्याचा दावा राहील शरीफ यांनी केला आहे.
इंडियन आर्मीचा धमाका, पाकचे 7 जवान टिपले!
एन्काऊंटरमध्ये भारताचे 44 जवान मारले!
तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ दिलेल्या भोजन कार्यक्रमानंतर राहील शरीफ यांनी मीडियाशी संवाद साधत भारत-पाकिस्तान एन्काऊंटरवर विधान केलं.
"सध्या झालेल्या चकमकीत आम्ही भारताच्या 44 जवानांना मारलं. पण चकमकीत जवान मारले गेल्याची बाब भारत स्वीकारत नाही. आपल्या जवानांचा मृत्यू झाला हे कबूल करण्याची हिंमत भारतीय सैन्याने दाखवायला हवी. पाकिस्तान लष्कर प्रोफेशनल आहे आणि त्यांनी कारणाशिवाय झालेल्या गोळीबाराचं योग्य उत्तर दिलं," असंही राहील शरीफ यांनी सांगितलं.
"भारतीय पंतप्रधानांना संदेश पोहोचला आहे की त्यांच्या आक्रमक कारवाईचा कोणताही फायदा झाला नाही," असंही पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणाले.