एक्स्प्लोर

Nagpur : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण गरजेचे : जयदीप पांडे

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 या कायद्यात बालकांचे हित व त्यांच्या अधिकारांबाबत उचित तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. बालकांचे लैंगिक शोषण व लैंगिक दुरुपयोग हे अपराध आहेत.

नागपूरः लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 या कायद्यात बालकांचे हित व त्यांच्या अधिकारांबाबत उचित तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. बालकांचे लैंगिक शोषण व लैंगिक दुरुपयोग हे अपराध असल्याचे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव जयदीप पांडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, दीक्षाभूमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचे संरक्षण कायदा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव जयदीप गोवर्धन पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य राजेंद्र राठी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिमा लोखंडे, प्राचार्या डॉ.बी.ए. मेहेरे, प्राचार्या डॉ.एच.व्ही.मेनन या उपस्थित होत्या.

कायदेविषयक शिबिराचे प्रास्ताविक करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य ॲड .  राजेंद्र राठी म्हणालेत, लोकसंख्या वाढ ही एक अतिशय भीषण समस्या जगासमोर उभी आहे. जगभरात दर सेकंदाला सरासरी चार पेक्षा जास्त बालके जन्माला येतात. 1 जानेवारी 2022 रोजी जगाची लोकसंख्या 7 अब्ज 86 कोटी 88 लाख एवढी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्ती वरचा ताण खूप वाढला आहे. निसर्ग संपदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. 11 जुलै यादिवशी लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते.

दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव जयदीप पांडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 या कायद्यात बालकांचे हित व त्यांच्या अधिकारांबाबत उचित तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. बालकांचे लैंगिक शोषण व लैंगिक दुरुपयोग हे अपराध आहेत. पुढे त्यांनी बालकांची काळजी व संरक्षणाबाबत सदर कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. विधी सेवा प्रत्येकाला मिळावी, कोणताही नागरिक आपल्या आर्थिक व सामाजिकदृष्ट्या न्यायापासून वंचित राहणार नाही, अशी भारतीय राज्यघटनेच्या कलम 39-अ मध्ये करण्यात आलेली आहे. या कलमाद्वारे प्रत्येकाला म्हणजे अनुसूचित जाती, जमाती व आर्थिकदृष्ट्या ज्यांचे उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना मोफत कायदेविषयक सहाय्य केल्या जाते. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत आर्थिक, सामाजिक, राजकीय, समता न्याय व बंधुता या आधारावर आपण भारतीय लोकांनी राज्य घटना स्वीकृत केली आहे. त्याद्वारे प्रत्येक भारतीयाला महिला व पुरुष असा भेद न करता नागरिक या नात्याने नागरिक अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यांना आपण मुलभूत अधिकार असे म्हणतो. या अधिकारांचा वापर महिलांनी स्वत:च्या संरक्षणाखाली करीत असतांना समाज हितांचा विसर पडू नये.

प्राचार्या श्रीमती डॉ.बी.ए.मेहरे यांनी लिगल ऐड क्लिनीक मार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत सहाय्य व सल्ला योजनांबाबत माहिती देऊन सांगितले की, आज आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागते. त्या कायदेशीर समस्या कशाप्रकारे सोडवायच्या याबाबत कुठलीही माहिती नसते. त्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला मोफत व कायदेशीर सहाय्य सल्ला देण्याचे काम करते. कार्यक्रमाला विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक डॉ.प्रतिमा लोखंडे तर आभार प्रदर्शन प्राचार्या डॉ.एच.व्ही.मेनन यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
Hanuman Ansh Box Office Collection: ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
Kudal News: संतापजनक! शालेय पोषण आहारात मुदत संपलेले मसाले, स्वच्छतागृहाच्या शेजारी धान्याचा साठा; कुडाळच्या नामांकित शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
संतापजनक! शालेय पोषण आहारात मुदत संपलेले मसाले, स्वच्छतागृहाच्या शेजारी धान्याचा साठा; कुडाळच्या नामांकित शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शिवसेना आक्रमक
Pune Traffic Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Traffic Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
Devendra Fadnavis Ganesh Idol: डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा'
डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा', गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Supreme Court Abu Salem: कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Embed widget