Chips Packet : पॅकेटमध्ये इतक्या कमी प्रमाणात चिप्स का असतात? जास्त हवा का भरली जाते? वाचा यामागचं कारण

Chips Packet : CDA अप्लायन्सेसच्या अभ्यासात असे आढळून आले की, चिप्सचे पॅकेट जवळपास 72 टक्के रिकामे असते.

Continues below advertisement

Chips Packet : अनेक लोकांना चिप्स खायला आवडतात. कारण त्याची चवच इतकी चविष्ट असते आणि पॅकेजिंगच इतकं भारी असतं ते खाण्याचा मोह आवरत नाही. अनेकजण मूड चांगला ठेवण्यासाठी चिप्स खातात. तुम्ही सुद्धा अनेकदा चिप्स खाल्ले असतील जरी चिप्सच्या चवीने आपलं मन भरत असलं तरी मात्र, चिप्सने भरलेलं पॅकेट कधीच मिळत नाही. जेव्हाही आपण चिप्सचं पॅकेट उघडतो तेव्हा सर्वात आधी अर्ध भरलेलं पॅकेट दिसतं आणि ते पाहून अस्वस्थ व्हायला होतं. यासाठी 'किंमत एवढी आणि काम असं' असे म्हणणारेही अनेकजण आपल्या आजूबाजूला दिसतात. मात्र, यामागे एक खास कारण आहे. पॅकेटमध्ये चिप्स नेहमी कमी का असतात याचं कारण जाणून घ्या. 

Continues below advertisement

खरं तर, यूकेच्या स्नॅक, नट आणि क्रिस्प मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननुसार, चिप्स अधिक काळ फ्रेश ठेवता येतील यासाठी पॅकेटचा अर्धा भाग रिकामा ठेवला जातो. चिप्स अतिशय नाजूक असतात. अगदी हलक्या स्पर्शानेही ते तुटू शकतात. अशा वेळी चिप्सचं पॅकेट फुगल्यामुळे आत भरलेली हवा हे चिप्स तुटण्यापासून वाचवण्याचे काम करते. 2017 मध्ये, CDA अप्लायन्सेसच्या अभ्यासात असे आढळून आले की, चिप्सचे पॅकेट जवळपास 72 टक्के रिकामे असते. तर केवळ 28 टक्के पॅकेटमध्ये चिप्स असतात.  

चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस का भरला जातो?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चिप्सच्या पॅकेटात 72 टक्के फक्त हवाच भरलेली असते? तर रिकाम्या पॅकेटमध्ये फक्त हवा नसून त्यात नायट्रोजन वायू भरलेला असतो. हा नायट्रोजन वायू पॅकेटमधील चिप्स तुटण्यापासून वाचवतो आणि या वायूमुळे चिप्स लवकर खराबही होत नाहीत. स्नॅक, नट आणि क्रिस्प मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या नुकत्याच एका अभ्यासाला असे दिसून आले आहे की, चिप्सला वाया जाण्यापासून रोखण्याव्यतिरिक्त, नायट्रोजन वायू पॅकेटचे नुकसान होण्यापासून देखील संरक्षण करते. 

चिप्स खराब होण्याची शक्यता नाही

चिप्सची पॅकेजिंग तापमानानुसार विस्तारत जाते आणि कमी होते. यामुळे पॅकेटमध्ये असलेला गॅस गरम हवामानात मोठ्या प्रमाणात आणि थंड वातावरणात कमी प्रमाणात असतो. 2017 च्या एका अभ्यासानुसार, चिप्सच्या पॅकेटमध्ये भरलेली हवा चिप्सना दीर्घकाळ ताजे ठेवण्याचे काम करते. यामुळे ते खराब होण्याची शक्यता नाही. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Ear Fact : एखादी व्यक्ती खूप वेगाने बोलते तेव्हा तुम्हाला काहीच का समजत नाही? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola