Shiv Sena MLA Disqualification Case : राहुल पाटील (Rahul Patil) परभणी (Parbhani) मतदारसंघातून  निवडून येत विधानसभेत पोहोचले होते. आज त्यांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला विधानसभा (MLA Disqualification Case) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी घेतला आहे. 'मातोश्री'ची निष्ठा राखणारे राहुल पाटील (MLA Rahul Patil) पात्र ठरणार की अपात्र? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यात ते पात्र ठरले आहेत. 


कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही (MLA Rahul Patil)


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेक आमदार सोडून गेले. मात्र, एकएक आमदार सोडून जात असताना परभणीचे आमदार राहुल पाटील (MLA Rahul Patil) मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहिले. घरात कोणतीही राजकीय पार्शभूमी नव्हती. वडील डॉ. वेदप्रकाश पाटील हे कृषी क्षेत्रातील प्राध्यापक, निवृत्त कुलगुरू होते. त्यामुळे वेदप्रकाश यांनी देखील शिक्षण क्षेत्रातच काम करायचे असे ठरवले.


'मातोश्री'ची निष्ठा राखली (Uddhav Thackeray)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक जणांनी गुवाहाटी गाठली. ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडत शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक आमदार सोडून गेले. मात्र, एकएक आमदार सोडून जात असताना परभणीचे आमदार राहुल पाटील मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहिले. आमदार पाटील यांच्या संकल्पनेतून ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा, परित्यक्ता स्वावलंबन संकल्प’ योजना राबविण्यात आल्या. त्यांच्या या योजनेच्या माध्यमातून दोन प्रशिक्षण केंद्रांवर महिलांना शिवणयंत्र प्रशिक्षण दिले जात गेले. 


2012 पासून युवासेनेत कार्यरत  (MLA Rahul Patil)


राहुल पाटील (MLA Rahul Patil) यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९९८ साली एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2012 साली ते युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. मराठावाडा संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. 2014 मध्ये परभणी विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर थेट राजकीय जीवनात त्यांचा प्रवेश झाला. आज त्यांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला विधानसभा (MLA Disqualification Case) अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) घेणार आहेत. 'मातोश्री'ची निष्ठा राखणारे राहुल पाटील पात्र ठरणार की अपात्र? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल पाटील यांची आमदारकी कायम राहणार? की ते अपात्र ठरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shiv Sena MLA Disqualification Case : प्रतीक्षा संपणार! शिवसेना आमदार अपात्रतेचा आज महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे देशाचे लक्ष