Ecuador Gunmen : इक्वाडोरमध्ये (Ecuador) थेट प्रक्षेपणादरम्यान (LIVE TV) 13 बंदुकधारी व्यक्ती (Gunmen) घुसले आणि त्यांनी अँकरला धमकवायला सुरुवात झाली. लॅटीन अमेरिकन देश इक्वाडोरमध्ये ही मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. 13 बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी 9 जानेवारीला थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण (LIVE TV) सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला केला. या 13 जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात येणार असल्याची माहिती इक्वेडोर सरकारने माहिती दिली आहे.


स्फोटकांसह 13 बंदुकधारी थेट TV स्टुडिओमध्ये घुसले


इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये 13 दहशतवादी घुसले आणि त्यांनी स्टुडिओतील लोकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार लाईव्ह टीव्हीवर सुरु होता. 13 दहशतवादी तोंडांवर काळा कपडा बांधून हातात बंदूक आणि स्फोटकांसह टीव्ही स्टुडिओमध्ये घुसले आणि धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं. सुरुवातीला स्टुडिओमधील उपस्थितांना काय होतंय हे कळलंच नाही.  दहशतवाद्यांनी स्टुडिओमधील उपस्थितांना शांत राहण्यास सांगितलं, अन्यथा बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. हा लाईव्ह टीव्हीवर ही सर्व घटना घडली. या सर्व घटनेचं सुमारे 15 मिनिटे थेट प्रक्षेपण सुरु होतं. 






13 घुसखोर अटकेत


दरम्यान, इक्वाडोर पोलिसांनी सर्व बंदुकधारी व्यक्तींना अटक केली आहे. इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सर्व मास्क घातलेल्या घुसखोरांना अटक केली आहे. पोलिस कमांडर सेझर झापाटा यांनी टेलिमाझोनास या टीव्ही चॅनेलला या घटनेबाबत अधिक माहिती सांगितलं की, अधिकाऱ्यांनी बंदूकधाऱ्यांकडून बंदुका आणि स्फोटके जप्त केली आहेत.


टीसी टेलिव्हिजनच्या प्रमुखांनी सांगितलं नेमकं काय घडलं?


टीसी टेलिव्हिजनच्या बातम्या प्रमुख, अलिना मॅनरिक यांनी सांगितले की, जेव्हा मास्क घातलेल्या पुरुषांचा एक गट इमारतीत घुसला तेव्हा ती स्टुडिओसमोरील नियंत्रण कक्षात होती. मॅनरिक यांनी पुढे सांगितलं की, त्यापैकी घुसखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर बंदूक लावली आणि त्याला जमिनीवर बसण्यास सांगितलं. तोपर्यंत घटनेचे थेट प्रक्षेपण केलं जात होतं, पण सुमारे 15 मिनिटांनी स्टेशनचा सिग्नल कट झाला. 




सात पोलिसांचं अपहरण, ड्रग माफिया तुरुंगातून फरार 


दरम्यान, इक्वाडोमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. मंगळवारी एकीकडे टीव्ही स्टुडिओवर हल्ला झाला, तर दुसरीकडे रात्रीच 7 पोलिसांचं अपहरण झालं आहे, त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. याशिवाय एक धोकादायक ड्रग माफिया जोस अडोल्फो मॅकियास उर्फ फिटो इक्वेडोरमधील तुरुंगातून फरार झाला आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्रपतींनी तुरुंगांवर लष्कराने पहारा ठेवण्याचे आदेश दिले. याशिवाय देशात कार्यरत असलेल्या 20 अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना दहशतवादी गट म्हणून घोषित करण्यात यावं, असा आदेश जारी करण्यात आला होता.