Raksha Bandhan 2023 : भारतातील सणांचे (Festival) महत्व खूप आहे. प्रत्येक सण साजरे करण्यामागे काहीतरी अध्यात्मिक कारणे आहेत. होळी असो, दिवाळी असो, राखी असो, ईद असो किंवा ख्रिसमस असो, देशात प्रत्येक सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारपेठांची चमक, खरेदी आणि घरांची साफसफाई यावरून दिसून येते की लोक त्याच्या उत्सवाची तयारी करू लागले आहेत. तसे, धार्मिक स्थळेही सणांशी जोडलेली आहेत. भारतात अनेक मंदिरे आहेत, परंतु काही मंदिरे अशी आहेत ज्यांची वेगळी कथा किंवा संकल्पना आहे. एक मंदिर आहे ज्याचा रक्षाबंधनाशी संबंध आहे. हे मंदिर फक्त राखी पोर्णिमेच्या दिवशीच उघडते. असं म्हणतात की या मंदिरात देवर्षी नारद 364 दिवस श्रीविष्णूंची पूजा करतात आणि येथे माणसाला फक्त एका दिवसासाठी पूजा करण्याचा अधिकार आहे. हे मंदिर कुठे आहे आणि इथे कसे पोहोचता येईल ते सविस्तर जाणून घेऊयात.
मंदिर कोठे आहे?
हे मंदिर आहे उत्तरखंडातील चमोली जिल्ह्यात आहे. या मंदिराला वंशीनारायण मंदिर असे संबोधले जाते. हे मंदिर भगवान विष्णूचे असल्याकारणाने या मंदिराचे नाव वंशीनारायण पडले. मंदिरात शिव, गणेश आणि वनदेवीच्या मूर्तीही स्थापित आहेत.
राखी पोर्णिमेच्या दिवशी उघडले जाते मंदिर
असे म्ह़टले जाते की, या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात आणि एकाच दिवशी ते उघडतात म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी. प्रथेनुसार येथील महिला आणि मुली भावांनी ओवाळण्याआधी देवाची पूजा करतात.
देवाला लोणीचा प्रसाद
लोक मंदिराजवळ प्रसाद बनवतात, ज्यासाठी प्रत्येक घरातून लोणी देखील येते. प्रसाद तयार झाल्यानंतर तो भगवान विष्णूला अर्पण केला जातो.
या मंदिरात कसे जावे
हे मंदिर उरगम गावापासून 12 किलोमीटर दूर आहे. येथे जाण्याकरता काही किलोमीटर अंतर तुम्हाला चालत पार करावे लागेल. जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर तुम्हाला हरिद्वार ऋषिकेश रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल. ऋषिकेश ते जोशी मठ हे अंतर सुमारे 225 किलोमीटर आहे. दरी जोशीमठपासून 10 किमी अंतरावर असून येथून तुम्ही उरगम गावात पोहोचू शकता. यानंतरचा पुढील रस्ता परत तुम्हाला चालतच पार करावा लागेल.
ही बातमी वाचा